सचिन तेंडुलकरची शून्यावर विकेट घेणारा Bhuvneshwar Kumar

Pranali Kodre

भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा जन्म मेरठमध्ये 5 फेब्रुवारी 1990 रोजी झाला असून तो रविवारी 33 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Bhuvneshwar Kumar | Dainik Gomantak

भारताच्या उत्तम स्विंग गोलंदाजांमध्ये भुवीचा समावेश होते. त्याच्याकडे चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची कला आहे.

Bhuvneshwar Kumar | Dainik Gomantak

भुवीने 2008-09 हंगामातील रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशकडून मुंबईविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरला शुन्यावर बाद केले होते.

Bhuvneshwar Kumar | Dainik Gomantak

त्यावेळी भुवी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये देशांतर्गत स्पर्धेत सचिनला शुन्यावर बाद करणारा पहिलाच गोलंदाज बनला होता.

Bhuvneshwar Kumar | Dainik Gomantak

भुवीने डिसेंबर 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना 9 धावाच देत 3 विकेट्स घेतल्या होत्या.

Bhuvneshwar Kumar | Dainik Gomantak

त्यानंतर त्याने भारताकडून डिसेंबर 2012 मध्येच वनडे आणि फेब्रुवारी 2013 मध्ये कसोटीत पदार्पण केले.

Bhuvneshwar Kumar | Dainik Gomantak

त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गला 18 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या टी20 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या.

Bhuvneshwar Kumar | Dainik Gomantak

त्यावेळी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एका डावात ५ विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला होता.

Bhuvneshwar Kumar | Dainik Gomantak

भुवनेश्वरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात पहिली विकेट फलंदाजाला त्रिफळाचीत करत घेतली आहे.

Bhuvneshwar Kumar | Dainik Gomantak

त्याने सर्वात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पाकिस्तानच्या नासिर जमशेदला, वनडेत मोहम्मद हफीज आणि कसोटीत डेव्हिड वॉर्नरला त्रिफळाचीत केले होते.

Bhuvneshwar Kumar | Dainik Gomantak

भुवनेश्वर कुमार आयपीएलमध्ये सलग दोन हंगामात पर्पल कॅप जिंकणारा एकमेव भारतीय आहे. त्याने 2016 आणि 2017 हंगामात पर्पल कॅप जिंकली होती.

Bhuvneshwar Kumar | Dainik Gomantak

भुवीने सनरायझर्स हैदराबादकडून सर्वाधिक 130 विकेट्स घेतल्या आहेत.

Bhuvneshwar Kumar

भुवी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक निर्धाव (Maiden) षटके टाकणारा भारतीय गोलंदाज आहे. त्याने 10 षटकात निर्धाव गोलंदाजी केली आहे.

Bhuvneshwar Kumar | Dainik Gomantak

भुवीने आत्तापर्यंत 21 कसोटी, 121 वनडे आणि 87 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये मिळून त्याने 294 विकेट्स घेतल्या आहेत.

Bhuvneshwar Kumar | Dainik Gomantak
Team India | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी