Sunrisers Eastern Cape X/SunrisersEC
क्रीडा

SA20: मार्करमच्या नेतृत्वात सनरायझर्सने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद, फायनलमध्ये सुपर जायंट्स पराभूत

Sunrisers Eastern Cape won SA20: एडेन मार्करमच्या नेतृत्वातील सनरायझर्स इस्टर्न केप संघाने सलग दुसऱ्यांदा SA20 स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.

Pranali Kodre

Sunrisers Eastern Cape won SA20 title for second time:

शनिवारी (10 फेब्रुवारी) साऊथ आफ्रिका20 (SA20) स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. सनरायझर्स इस्टर्न केप विरुद्ध डर्बन्स सुपर जायंट्स संघात हा अंतिम सामना पार पडला.

या सामन्यात एडेन मार्करमच्या नेतृत्वातील सनरायझर्स संघाने 89 धावांनी विजय मिळवत विजेतेपदाची ट्रॉफी जिंकली.

सनरायझर्सने मार्करमच्या नेतृत्वात सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. गेल्यावर्षी पहिल्यांदा झालेल्या या लीग स्पर्धेचे विजेतेपद देखील मार्करमच्या नेतृत्वातील सनरायझर्सनेच जिंकले होते.

शनिवारी केपटाऊनला झालेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्सने सुपर जायंट्ससमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना सुपर जायंट्स संघ 17 षटकात 115 धावांवर सर्वबाद झाला.

सुपर जायंट्स संघाकडून विआन मुल्डरने सर्वाझिक 38 धावा केल्या. तसेच ड्वेन प्रिटोरियस (28), मॅथ्यू ब्रिझके (18) आणि ज्युनियर डाला (15) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली.

सनरायझर्सकडून गोलंदाजी करताना मार्को यान्सिनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच डॅनिएल वोराल आणि ओटनिल बार्टमन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच सिमन हार्मरने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, सनरायझर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 204 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून ट्रिस्टन स्टब्सने सर्वाधिक 56 धावांची नाबाद खेळी केली. 30 चेंडूत केलेल्या या खेळीत त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले.

तसेच टॉम अबेलने 34 चेंडूत 55 धावांची खेळी केली. त्याचबरोबर कर्णधार एडेन मार्करमने 26 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या, तर सलामीवीर जॉर्डन हर्मननेही 26 चेंडूत 42 धावांची खेळी केली.

सुपर जायंट्सकडून गोलंदाजी करताना कर्णधार केशव महाराजने 2 विकेट्स घेतल्या, तर रिस टोपलीने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT