Liquor Seized In Sindhudurg: गोव्याची दारू बेळगावला नेण्याचा 'प्लॅन' फसला; 64 हजारांच्या मुद्देमालासह दोघे ताब्यात, सावंतवाडी पोलिसांची कारवाई

Goa Made Liquor Smuggling: आंबोली चेकपोस्टवर सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या बेकायदा दारूची तस्करी उघडकीस आणली आहे.
Liquor Seized In Sindhudurg
Liquor Seized In SindhudurgDainik Gomantak
Published on
Updated on

सावंतवाडी: आंबोली चेकपोस्टवर सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या बेकायदा दारूची तस्करी उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी बेळगावमधील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांच्याकडून दारूचा साठा आणि दुचाकीसह एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सीमाभागातून होणाऱ्या बेकायदा वाहतुकीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याने तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आंबोली चेक पोस्टवर मध्यरात्री सापळा

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा दारूची मोठी खेप नेली जाणार असल्याची गोपनीय माहिती सावंतवाडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली चेक पोस्टवर कडक नाकाबंदी करण्यात आली होती.

काल रात्री उशिरा एक संशयास्पद दुचाकी गोव्याच्या दिशेने येताना दिसली. पोलिसांनी या दुचाकीला थांबवून तपासणी केली असता, त्यात गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स लपवून ठेवल्याचे आढळून आले.

Liquor Seized In Sindhudurg
Goa Crime: आधी प्रेम, मग अनन्वित अत्याचार अन् शेवटी गळा चिरला, रशियन सिरीयल किलरच्या क्रूरतेनं हादरला गोवा; लवकरच उलघडणार 10 तरुणींच्या मृत्यूचं गूढ?

बेळगावचे दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत ज्योती गौडा पाटील (वय ३२) आणि आकाश भीमा मांगनुरे (वय २६, दोन्ही रा. चिकोडी-बेळगाव) या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीची झडती घेतली असता २४ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा सापडला.

पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीची दुचाकी आणि दारू असा एकूण ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही दारू नक्की कोणाला पुरवली जाणार होती, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Liquor Seized In Sindhudurg
Goa Opinion: आजचा 'गोवा' हा पोर्तुगिजांनी 18व्या शतकाच्या अखेरीस काबीज केलेला भूभाग होय; गोवन आधुनिकता

पोलीस पथकाची यशस्वी कामगिरी

सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार संतोष गलोले, मनीष शिंदे, सचिन चव्हाण आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून आंबोली घाटमार्गे गोव्यातील दारूची तस्करी वाढल्याच्या तक्रारी येत होत्या, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com