Sunil Chhetri Dainik Gomantak
क्रीडा

Sunil Chhetri Record: सुनील छेत्रीने मोडला 'या' स्टार अनुभवी खेळाडूचा रेकॉर्ड, मेस्सीला देणार टक्कर!

Saff Championship 2023: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने बुधवारी मोठा विक्रम केला. तो फुटबॉलच्या इतिहासातील चौथा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे.

Manish Jadhav

Saff Championship 2023: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने बुधवारी मोठा विक्रम केला. तो फुटबॉलच्या इतिहासातील चौथा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे.

बुधवारी बंगळुरुच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या SAFF चॅम्पियनशिपच्या पहिल्या सामन्यात त्याने हॅट्ट्रिक केली. या हॅट्ट्रिकसह छेत्रीने 138 सामन्यात 90 गोल केले आहेत.

मुख्तार दाहारी यांचा विक्रम मोडला

दरम्यान, फुटबॉल इतिहासात सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत सुनील छेत्रीने मलेशियाचा दिग्गज फुटबॉलपटू मोख्तार दहारीचा विक्रम मोडला. त्याने 142 सामन्यांत 89 गोल केले होते. यासह छेत्री अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या जवळ पोहोचला आहे.

मेस्सीने आतापर्यंत 173 सामन्यांत 103 गोल केले आहेत. छेत्री त्याच्या 13 गोलने मागे आहे. या यादीत आघाडीवर पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आहे. रोनाल्डोने 200 सामन्यांमध्ये 123 गोल केले आहेत. तर इराणचा अली दाई 148 सामन्यांत 109 गोलांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, भुवनेश्नरमध्ये इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकल्यानंतर टीम इंडियाने SAFF चॅम्पियनशिपमध्ये धमाकेदार सुरुवात केली. टीम इंडियाने पाकिस्तानचा 4-0 असा धुव्वा उडवला.

भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने अवघ्या 10 मिनिटांत धमाकेदार सुरुवात केली. सहा मिनिटांनंतर त्याने पेनल्टीवर गोल करत आघाडी घेतली. भारतीय संघाने पहिल्या हाफमध्ये 2-0 असे वर्चस्व राखले.

त्याचवेळी, 74 व्या मिनिटाला छेत्रीने पुन्हा एकदा पेनल्टीवर गोल करत हॅट्ट्रिक साधली. भारतीय संघाने सामन्यावर पूर्णपणे पकड मजबूत केला होती. दरम्यान, 81व्या मिनिटाला उदांता सिंगने आणखी एक गोल नोंदवत पाकिस्तान संघाला आस्मान दाखवले. पाकिस्तान (Pakistan) संघाला शेवटपर्यंत एकही गोल करता आला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT