IND vs PAK Football: दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) चॅम्पियनशिप अंतर्गत मंगळवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना खेळला जात आहे. या सामन्यात एकीकडे मुसळधार पाऊस पडला तर दुसरीकडे गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. 45 व्या मिनिटाला हे दृश्य पाहायला मिळाले.
दरम्यान, टीम इंडियाने (Team India) तोपर्यंत दोन गोल केले होते. 45 व्या मिनिटाला भारत-पाकिस्तानचे खेळाडू चेंडू पकडण्याच्या धडपडीत साईड लाईनच्या जवळ आले. चेंडू उचलण्याचा प्रयत्न करत असताना पाकिस्तानच्या खेळाडूचा पाय भारतीय खेळाडूला लागला.
जेव्हा तो चेंडू उचलायला गेला तेव्हा भारतीय प्रशिक्षक इगोर स्टिमाक यांनी धाव घेतली आणि पाकिस्तानी खेळाडूकडून तो घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर पाकिस्तानी खेळाडू अब्दुल्ला इक्बाल भडकला.
दुसरीकडे, दोन्ही संघाचे खेळाडू आमनेसामने आले. यानंतर अब्दुल्लाने भारतीय खेळाडूंशी गैरवर्तन केले. प्रकरण वाढल्यावर इतर खेळाडूही हस्तक्षेप करायला आले.
त्याचवेळी, भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री आणि पाकिस्तानचा (Pakistan) कर्णधार हसन बशीर यांनी त्यांच्या संघातील खेळाडूंना समजावून सांगितले. तो प्रशिक्षकाशी बोलतानाही दिसला. त्यानंतरच सामना पुन्हा सुरु होऊ शकला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.