Stuart Broad Dainik Gomantak
क्रीडा

Stuart Broad: कारकिर्दीतील शेवटच्या कसोटीत ब्रॉडचा मोठा पराक्रम, जो शतकानुशतके लक्षात राहणार!

Stuart Broad: ऍशेस मालिका संपल्यानंतर आता इंग्लंडचा स्टार गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दही संपली आहे.

Manish Jadhav

Stuart Broad: ऍशेस मालिका संपल्यानंतर आता इंग्लंडचा स्टार गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दही संपली आहे.

ऍशेस मालिकेतील शेवटची कसोटी हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना होता, ज्याची घोषणा त्याने सामन्याच्या चौथ्या दिवशी केली होती. दरम्यान ब्रॉडने असा विश्वविक्रम आपल्या नावावर केला, जो शतकानुशतके स्मरणात राहील.

खरे तर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) मालिकेतील पाचव्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडने फलंदाजीत शेवटच्या चेंडूवर षटकार मारला तर गोलंदाजीत शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली.

या पराक्रमाच्या जोरावर कसोटी कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर विकेट घेणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. ब्रॉडच्या आधी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम इतर कोणत्याही खेळाडूला करता आलेला नाही.

ऍशेस मालिकेमध्ये स्टुअर्ट ब्रॉडची शानदार कामगिरी

दरम्यान, स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) ऍशेस मालिकेत शानदार गोलंदाजी केली. मिचेल स्टार्कनंतर या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. मालिकेत ब्रॉडने 22 विकेट घेतल्या.

त्याची इकॉनॉमी 3.39 होती. 65 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. ब्रॉडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 कसोटी सामन्यांच्या 10 डावात 22 विकेट्स घेतल्या. या मालिकेत तो इंग्लंडकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.

स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी क्रिकेट कारकीर्द

स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून 167 सामने खेळले. यादरम्यान त्याने 604 विकेट घेतल्या आहेत. 20 वेळा कसोटीत 5 विकेट घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

एका कसोटीत तीन वेळा 10 बळी घेण्याचा पराक्रमही ब्रॉडने केला आहे. ब्रॉडने फलंदाजीतही कमाल केली. त्याने 244 डावात 3662 धावा केल्या आहेत. त्‍याने 13 अर्धशतके आणि एक शतकही झळकावले आहे.

ऍशेस मालिकेची स्थिती

ऍशेस मालिकेतील शेवटचा कसोटी सामना यजमान इंग्लंडने 49 धावांनी जिंकला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या 5 कसोटी सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. पहिले 2 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले, तर तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने शानदार पुनरागमन करत विजय मिळवला होता. मात्र, चौथी कसोटी अनिर्णित राहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT