Ashes 2023: ब्रॉडला दिला गोड निरोप! ऑस्ट्रेलियाचं स्वप्न भंगलं, इंग्लंडने जिंकली 5वी कसोटी

Ashes 2023: ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या 5व्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 49 धावांनी पराभव करत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली.
Stuart Broad
Stuart BroadDainik Gomantak
Published on
Updated on

Ashes 2023: ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या 5व्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 49 धावांनी पराभव करत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली.

ऍशेस मालिकेचे पहिले दोन सामने गमावल्यानंतर बेन स्टोक्सच्या संघाने जोरदार पुनरागमन केले. मालिकेतील चौथा सामना पावसामुळे वाहून गेला नसता तर इंग्लंडला मालिका 3-2 ने जिंकता आली असती.

दरम्यान, पाचव्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियन संघ 384 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 334 धावांवर गारद झाला.

डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी 140 धावांची भागीदारी करत कांगारुंना चांगली सुरुवात करुन दिली, पण चेंडू बदलल्याने ऑस्ट्रेलियाचे नशीब पालटले. 28 धावांच्या आत वॉर्नर, ख्वाजा आणि लबुशेनच्या रुपाने इंग्लंडला तीन विकेट्स मिळाल्या.

खराब शॉट

दरम्यान, इंग्लंडच्या गोलंदाजांनी अवघ्या 29 धावांत तीन बळी घेतले. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा अवघ्या 2 षटकांत बाद झाले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला मार्नस लबुशेनही 13 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.

मग कसेबसे स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि ट्रॅव्हिस हेडने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण स्मिथ आणि हेड इंग्लिश गोलंदाजांच्या येणाऱ्या चेंडूंना न्याय देऊ शकले नाहीत आणि खराब शॉट्स खेळून बाद झाले.

Stuart Broad
Ashes 2023: इंग्लिश चाहत्याने 'बोअरिंग' म्हणताच भडकला लॅब्युशेन, ख्वाजानेही दिले प्रत्युत्तर, पाहा Video

दुसरीकडे, सहा चेंडूंत दोन मोठ्या विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाची अवस्था दयनीय झाली. विजयासाठी 100 धावा करताना त्यांना घाम फुटला. त्यानंतर मोईन अलीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू अडकले.

कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल मार्शसह ऑस्ट्रेलियन फलंदाज त्याच्या गोलंदाजीसमोर टिकू शकले नाहीत. 20 धावांच्या आत चार गडी बाद झाले.

नंतर टॉड मर्फी आणि यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरी यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण ते ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

बेन स्टोक्सने झेलबाद केले

तसेच, या सामन्यात बेन स्टोक्सची मोठी संधी हुकली. तो स्टीव्ह स्मिथला लवकर आऊट करु शकला असता, पण झेल घेतल्यानंतर सेलिब्रेशन करण्याच्या नादात त्याने चेंडू टाकला. यामुळे स्मिथ बाद होण्यापासून वाचला. मात्र, नंतर त्याला 54 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

Stuart Broad
Ashes Series 2023: जो रुटचा भीम पराक्रम, इंग्लंडसाठी केले 'हे' 2 मोठे रेकॉर्ड!

स्टुअर्ट ब्रॉडला निरोप

इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. या कसोटीसह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याला 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com