Arjuna Ranatunga & Jay Shah  Dainik Gomantak
क्रीडा

Sri Lanka Government Apology: श्रीलंका सरकारने मागितली जय शाह यांची माफी, अर्जुन रणतुंगा यांचे आरोप निराधार!

Manish Jadhav

Sri Lanka Government Apology: एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील खराब कामगिरीनंतर श्रीलंकेच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. यापूर्वी, श्रीलंका सरकारच्या हस्तक्षेपामुळे आयसीसीने सदस्यत्व रद्द केले आणि आता श्रीलंका सरकार पुन्हा एकदा वादात सापडले आहे.

वास्तविक, श्रीलंकेचे माजी कर्णधार आणि विद्यमान सरकारचे नेते अर्जुन रणतुंगा यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यावर निराधार आरोप केले होते.

त्यानंतर वादाला तोंड फुटले होते. आता त्यांच्या वक्तव्यानंतर खुद्द श्रीलंका सरकारला जय शाह यांची माफी मागावी लागली आहे. रणतुंगा यांच्या या वक्तव्याचाही सरकारने निषेध केला आहे.

रणतुंगाचं तोंडघशी पडले

वास्तविक, ICC ने श्रीलंका क्रिकेटचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर रणतुंगा यांनी जय शाह यांच्यावर आरोप केले होते. श्रीलंका क्रिकेट बीसीसीआयचे सचिव चालवत असल्याचे ते म्हणाले होते. एवढ्यावरच न थांबता ते पुढे म्हणाले होते की, ''त्यांच्या दबावामुळे श्रीलंकन ​​क्रिकेटची स्थिती बिघडली आहे.

एक भारतीय माणूस श्रीलंकन ​​क्रिकेट संपवत आहे, कारण त्यांचे वडील देशाचा गृहमंत्री आहेत.'' या वक्तव्यानंतर रणतुंगाचं तोंड घशी पडले, जेव्हा श्रीलंकेच्या मंत्री कांचना विजेसेकेरा यांनी श्रीलंकेच्या संसदेत जय शाह यांचे नाव घेऊन माफी मागितली.

संसदेत माफी मागितली

श्रीलंकेच्या संसदेत (Parliament) मंत्री विजेसेकरा म्हणाल्या की, ''सरकार म्हणून आम्ही रणतुंगा यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख जय शाह यांची माफी मागतो.

आम्ही आमच्या उणिवा त्यांच्याविरुद्ध किंवा कोणत्याही देशाच्या माथी मारु शकत नाही. हा पूर्णपणे चुकीचा विचार होता.'' शुक्रवारी श्रीलंकेच्या संसदेत यावरुन बराच वाद झाला. विजेसेकेरा आणि हरिन फर्नांडो या मंत्र्यांनी जाहीर माफी मागितली.

आयसीसीने श्रीलंका क्रिकेटवर निलंबनाची कारवाई करण्यामागे त्यांनी अंतर्गत समस्यांना जबाबदार धरले आहे.

दुसरीकडे, श्रीलंकेत गेल्या वर्षी आर्थिक आणीबाणीमुळे अडचणी आल्या. सध्या सरकारच्या हस्तक्षेपामुळे राष्ट्रीय क्रिकेट संघाला मोठा फटका बसला आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा संघ 9व्या स्थानावर राहिला.

या कारणामुळे त्यांना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर पडावे लागले. यावर कारवाई करत सरकारने श्रीलंकन ​​क्रिकेट बोर्ड बरखास्त केले.

सरकारी हस्तक्षेपामुळे आयसीसीने कारवाई करत श्रीलंका क्रिकेटचे सदस्यत्व रद्द केले. आता या नव्या वादामुळे श्रीलंका क्रिकेटचे नाव पुन्हा एकदा आयसीसीच्या नजरेत कलंकित झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT