I-League Latest News Dainik Gomantak
क्रीडा

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत चर्चिल ब्रदर्ससमोर अॅरोजचा धोका

गोव्यातील संघ पाच सामने अपराजित

Kishor Petkar

I-League : आय-लीग फुटबॉल स्पर्धेत माजी विजेते चर्चिल ब्रदर्स सलग पाच सामने अपराजित आहेत, तरीही त्यांच्यासमोर नव्या दमाच्या इंडियन अॅरोजचा धोका असेल. चर्चिल ब्रदर्स व अॅरोज यांच्यातील सामना सोमवारी (ता. 18) कोलकात्यातील कल्याणी येथे खेळला जाईल. अॅरोजने मागील लढतीत केंकरे एफसीला नमवून स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली होती. या संघात नवोदित खेळाडूंचा भरणा आहे. निकालाबाबत चर्चिल ब्रदर्सला (Churchill Brothers) निश्चिंत राहता येणार नाही. अॅरोजचे 11 सामन्यांतून नऊ गुण आहेत. भारताचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू षण्मुगम व्यंकटेश यांच्या मार्गदर्शनाखाली अॅरोज संघ खेळत आहे.

चर्चिल ब्रदर्सने मागील पाच सामन्यांत चार विजय व एक बरोबरी अशी कामगिरी केली आहे, त्यापैकी तीन विजय ओळीने आहेत. त्यांनी अनुक्रमे नेरोका एफसी, रियल काश्मीर, केंकरे एफसीवर मात केली. गोव्यातील संघाचे सध्या 11 लढतीतून 17 गुण आहेत. त्यांचा नायजेरियन आघाडीपटू केनेथ इकेचुक्वू व ताजिकिस्तानचा कोमरोन तुर्सुनोव यांनी जोमदार फॉर्म प्रदर्शित करत गोल केले आहेत.

चर्चिल ब्रदर्सचे स्पॅनिश प्रशिक्षक अंतोनियो रुएदा आशावादी आहेत. स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीसाठी पात्रता मिळविणे आणि चांगल्या कामगिरीचे सातत्य राखणे हेच आपल्या संघाचे लक्ष्य असल्याचे त्यांनी नमूद केले. स्पर्धेतील प्रत्येक सामना आव्हानात्मक आणि निर्णायक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. चर्चिल ब्रदर्स उत्कृष्ट संघ असून अशा बलाढ्य संघाविरुद्ध खेळणे आपल्या संघासाठी चांगली संधी असून प्रतिस्पर्ध्यांसाठी सामना सोपा ठरणार नाही याची दक्षता घेऊ, असे अॅरोजचे प्रशिक्षक व्यंकटेश यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात

- चर्चिल ब्रदर्सचे स्पर्धेत 5 विजय, 2 बरोबरी, 4 पराभव

- इंडियन अॅरोजचे 2 विजय, 3 बरोबरी, 6 पराभव

- उभय संघांतील शेवटची लढत 10 जानेवारी 2021 रोजी

- तेव्हा चर्चिल ब्रदर्सचा 5-2 फरकाने दणदणीत विजय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT