sports ministry is preparing to organize womens league

 

Dainik Gomantak

क्रीडा

Sports Ministry: आता होणार फक्त मुलींची लीग

विशेष म्हणजे या लीगमध्ये चांगली बक्षीस रक्कम दिली जाणार आहे ज्यामध्ये क्रीडा महासंघांसोबतच क्रीडा मंत्रालयाचाही हातभार असणार आहे.

दैनिक गोमन्तक

आता तो दिवस दूर नाही जेव्हा देशात फक्त मुलींची क्रीडा लीग (women league) आयोजित केली जाईल. भारतीय मुलींच्या ऑलिम्पिक (olympics) यशानंतर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने एकाच वेळी अनेक खेळांमध्ये महिला लीग आयोजित करण्याची तयारी केली आहे.

हिशेब घेण्यास केली सुरुवात

क्रीडा मंत्रालयाने (Sports ministry) मुलींना खेळामध्ये पुढे जाण्यासाठी काही क्रीडा महासंघांला फक्त मुलींच्या लीगचे आयोजन करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे या लीगमध्ये चांगली बक्षीस रक्कम दिली जाणार आहे ज्यामध्ये क्रीडा महासंघांसोबतच क्रीडा मंत्रालयाचाही हातभार असणार आहे. त्याचबरोबर क्रीडा मंत्रालयाने क्रीडा महासंघांकडून गावातील खेळांसाठी काय केले याचा हिशेब घेण्यास सुरुवात केली आहे.

मंत्रालय करणार लीग आयोजित करण्यास मदत

मुली ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करत असतानाही क्रिकेट, बॅडमिंटन किंवा काही खेळ वगळता, महिलांना समर्पित कोणतीही लीग आयोजित केली जात नाही. मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने महिला लीग आयोजित करण्याची जबाबदारी क्रीडा महासंघांसमोर ठेवली आहे. क्रीडा मंत्रालयाने त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काही क्रीडा महासंघांवर महिला लीगच्या आयोजनाची जबाबदारीही सोपवली आहे. खेलो इंडिया अंतर्गत ही लीग आयोजित केली जाईल, ज्यामध्ये फक्त ज्युनियर मुलीच भाग घेऊ शकतील. लीगमधील त्यांच्या चांगल्या कामगिरीच्या आधारे त्यांची निवड करून त्यांना नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (NCOE) मध्ये पाठवले जाईल.

हॉकीचा प्रयोग ठरला यशस्वी

मंत्रालयाने 21 वर्षांखालील महिला हॉकी लीगच्या माध्यमातून प्रयोग सुरू केला असून, तो यशस्वी होताना दिसत आहे. त्यामुळेच आता इतर क्रीडा महासंघांनाही ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, नेमबाजी, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स यांसारख्या खेळांमध्ये महिला लीगचे आयोजन हे मंत्रालयाच्या अजेंड्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

आर्थिक मदतीमध्ये होणार कपात

क्रीडा मंत्रालयाने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी गाव आणि जिल्हा विभागीय स्तरावरांवरील क्रीडा महासंघांना महिला स्पर्धेचे आयोजन करण्यास सांगितले आहे. जे क्रीडा महासंघ विभागीय स्तरावर क्रीडा स्पर्धा आयोजित करत नाहीत, त्यांच्या आर्थिक मदतीमध्ये कपात केली जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT