केरळा ब्लास्टर्सचा विजयी धडाका; चेन्नईला पराभवाचा धक्का

सात सामने खेळल्यानंतर 12 गुणांसह केरळा ब्लास्टर्स तिसऱ्या क्रमांकावर आला आहे
ISL Football

ISL Football

Dainik gomantak

Published on
Updated on

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमातील सलग सहाव्या सामन्यात अपराजित राहताना केरळा ब्लास्टर्सने बुधवारी धडाकेबाज खेळ केला. त्यांनी दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीला 3-0 फरकाने पराभवाचा धक्का दिला. सामना वास्को येथील टिळक मैदानावर झाला.

सामन्याच्या नवव्या मिनिटास अर्जेंटिनाचा जोर्गे परेरा डायझ याने केरळा ब्लास्टर्ससाठी पहिला गोल केल्यानंतर 24 वर्षीय मध्यरक्षक सहल अब्दुल समद याने 38 व्या मिनिटास आघाडी वाढवली. परेरा डायझ व समद यांनी सलग दुसऱ्या लढतीत गोल नोंदवून केरळा ब्लास्टर्सची स्थिती पूर्वार्धातच बळकट केली.

<div class="paragraphs"><p>ISL Football</p></div>
आयुष उदितचे झुंजार प्रयत्न तोकडे, छत्तीसगडविरुद्ध पराभव

चेन्नईयीन एफसीच्या बचावफळीत खूप त्रुटी होत्या. त्याचा पुन्हा एकदा लाभ उठवत ब्राझीलियन ॲड्रियन लूना 79व्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सची स्थिती आणखीनच भक्कम केली. लूना याचा हा आयएसएल स्पर्धेतील पहिलाच गोल ठरला.

सर्बियाचे इव्हान व्हुकोमोनाविच यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सने अगोदरच्या लढतीत अव्वल स्थानावरील मुंबई (Mumbai) सिटीचा 3-0 फरकानेच पराभव केला होता, तोच धडाका त्यांनी चेन्नईयीनविरुद्धही कायम राखला. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत एटीके मोहन बागानकडून हार पत्करल्यानंतर केरळच्या संघाने सामना गमावलेला नाही. त्या लढतीनंतर त्यांनी सहा लढतीत तीन विजय व तेवढेच सामने बरोबरीत राखले आहेत.

गुणतक्यातही त्यांनी प्रगती साधली आहे. सात सामने खेळल्यानंतर 12 गुणांसह केरळा ब्लास्टर्स तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. जमशेदपूर एफसीचेही तेवढेच गुण आहेत, गोलसरासरी सरस असल्याने त्यांना दुसरा क्रमांक मिळाला. पहिल्या स्थानावरील मुंबई सिटीचे 15 गुण आहेत. स्पर्धेतील दुसऱ्या पराभवामुळे चेन्नईयीन (Chennai) एफसीची सहाव्या स्थानी घसरण झाली. सात लढतीनंतर त्यांचे 11 गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com