Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India: टीम इंडियाचा 'हा' सर्वात मोठा शत्रू बनला क्रीडामंत्री

Wahab Riaz: टीम इंडियाच्या सर्वात मोठ्या 'शत्रू'चे अचानक नशीब पालटले आहे. टीम इंडियाचा हा सर्वात मोठा 'शत्रू' अचानक क्रीडामंत्री झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Team India: टीम इंडियाच्या सर्वात मोठ्या 'शत्रू'चे अचानक नशीब पालटले आहे. टीम इंडियाचा हा सर्वात मोठा 'शत्रू' अचानक क्रीडामंत्री झाला आहे. वास्तविक, 2011च्या विश्वचषक उपांत्य फेरीत भारतीय संघासाठी अडचणीचा ठरलेला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझ पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा कार्यवाहक क्रीडामंत्री बनला आहे.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघातून बराच काळ बाहेर असलेला वेगवान गोलंदाज वहाब रियाझने क्रीडा क्षेत्रात सक्रिय असतानाच राजकारणात प्रवेश केला. आता त्याला पंजाब प्रांताचा कार्यवाहक क्रीडामंत्री बनवण्यात आले.

टीम इंडियाच्या सर्वात मोठ्या 'शत्रू'चे नशीब अचानक पालटले

वहाब रियाझ हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा तोच वेगवान गोलंदाज आहे, ज्याने 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या (India) उपांत्य फेरीत 46 धावा देऊन भारताच्या 5 दिग्गज फलंदाजांना बाद केले होते.

वहाब रियाझने या काळात वीरेंद्र सेहवाग (38 धावा), विराट कोहली (9 धावा), युवराज सिंग (0 धावा), महेंद्रसिंग धोनी (25 धावा) आणि झहीर खान (9 धावा) यांना बाद केले होते. रियाझ सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. मायदेशी परतल्यानंतर तो मंत्रीपदाची शपथ घेणार आहे.

क्रीडामंत्री झाला

37 वर्षीय वहाब रियाझला पेशावर झल्मीने यावर्षीच्या पाकिस्तान (Pakistan) सुपर लीगसाठी संघात कायम ठेवले आहे. क्रीडामंत्री म्हणून नियुक्ती असूनही तो आपली वचनबद्धता पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. रियाझने 2020 मध्ये शेवटचे पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. पाकिस्तान क्रिकेट संघासाठी वहाबने 27 कसोटी, 92 एकदिवसीय आणि 36 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो पीएसएलमध्ये सर्वाधिक 103 बळी घेणारा गोलंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT