Sporting Club The Goa Dainik Gomantak
क्रीडा

चर्चिल ब्रदर्सवरील विजयासह स्पोर्टिंग अव्वल !

गतविजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवा (Sporting Club The Goa) संघाने माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सवर 1-0 फरकाने विजय नोंदवत गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त केले.

दैनिक गोमन्तक

पणजी: गतविजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवा (Sporting Club The Goa) संघाने माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सवर 1-0 फरकाने विजय नोंदवत गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त केले. सामना शनिवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर (Dhuler Stadium) झाला. स्पर्धेत अपराजित असलेल्या स्पोर्टिंगचे आता आठ गुण झाले आहेत. चार सामन्यांत त्यांनी दोन विजय व दोन बरोबरीची नोंद केली आहे. स्पोर्टिंगने आता वास्को स्पोर्टस क्लबवर एका गुणाची आघाडी मिळविली आहे. चर्चिल ब्रदर्सचा (Churchill Brothers) हा स्पर्धेतील पहिला पराभव ठरला. तीन लढतीनंतर त्यांचे चार गुण कायम राहिले आहेत.

उत्तरार्धातील बदली खेळाडू क्लाईव्ह मिरांडा याने पन्नासाव्या मिनिटास जबरदस्त हेडिंग साधत गोल केला, जो स्पोर्टिंग क्लबला एक गुण मिळवून देण्यास पुरेसा ठरला. गिरीश नाईक याच्या पासवर क्लाईव्हचे हेडिंग रोखणे चर्चिल ब्रदर्सचा गोलरक्षक नोरा फर्नांडिस याला शक्य झाले नाही. मागील दोन मोसमात स्पोर्टिंगतर्फे सर्वाधिक गोल करणारा मार्कुस मस्कारेन्हास याला आजच्या लढतीत मुकावे लागले, तरीही गतविजेत्यांनी एकमेव गोलची आघाडी शेवटपर्यंत निसटू दिली नाही. चर्चिल ब्रदर्सने सामन्याच्या पूर्वार्धात वेगवान खेळ केला, पण त्यांना गोल करता आला नाही. चर्चिल ब्रदर्सच्या अफदाल याने स्पोर्टिंगच्या बचावफळीस चांगलेच सतावले. स्पोर्टिंगचा युवा खेळाडू लिस्टन कार्दोझ याने लक्षवेधक खेळ केला, मात्र अननुभवामुळे तो गोल नोंदविण्यात अपयशी ठरला. सामन्याच्या भरपाई वेळेस स्पोर्टिंगचा आघाडीपटू अकेराज मार्टिन्स याला दुखापत झाली, त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.

सेझा-मनोरा सामना आज

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत रविवारी सेझा फुटबॉल अकादमी व यूथ क्लब मनोरा यांच्यात सामना होईल. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर होईल. सध्या सेझा अकादमीने दोन बरोबरींसह दोन गुणांची कमाई केली आहे. मनोरा संघाने दोन लढतीतून तीन गुण प्राप्त केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT