पणजी जिमखान्यावर पुन्हा क्रिकेट!

पणजी (Panaji) जिमखाना वास्तू व मैदानाच्या नूतनीकरणामुळे गेली काही वर्षे राज्यातील या जुन्या मैदानावर क्रिकेट (Cricket) बंद होते
Players seen practicing on cricket ground in Panaji
Players seen practicing on cricket ground in PanajiDainik Gomantak
Published on
Updated on

कांपाल येथील पणजी (Panaji) जिमखान्याच्या ऐतिहासिक भाऊसाहेब बांदोडकर (Bhausaheb Bandodkar) मैदानावर पुन्हा एकदा क्रिकेटपटूंचा (Cricketers) उत्साह पाहायला मिळाला. पणजी जिमखाना वास्तू व मैदानाच्या नूतनीकरणामुळे गेली काही वर्षे राज्यातील या जुन्या मैदानावर क्रिकेट बंद होते. शनिवारी या मैदानावरील नव्या कोऱ्या खेळपट्टीवर गोव्याच्या २५ वर्षांखालील संभाव्य संघातील खेळाडूंत सराव सामना झाला.

Players seen practicing on cricket ground in Panaji
IND vs NZ: शमीकडे बोट दाखवणाऱ्यांना कोहलीने दिले चोख प्रत्युत्तर

गेल्या वर्षी लॉकडाऊन कालावधीत भाऊसाहेब बांदोडकर मैदान व खेळपट्टी नूतनीकरणाचे काम सुरू झाले होते. या मैदानावर पाच मुख्य खेळपट्ट्या व सराव खेळपट्ट्यांची सोय झाली आहे. गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) आणि पणजी जिमखाना यांच्यातील सांमजस्य करारांतर्गत मैदान तयार झाले आहे. मुख्य खेळपट्ट्यांचे काम झाल्यानंतर या मैदानावर छोटेखानी प्रदर्शनीय सामना झाला होता, पण एकदिवसीय स्वरूपाचा सराव सामना आज प्रथमच झाला.

Players seen practicing on cricket ground in Panaji
अफगाणिस्तान हरला पण... रशीद खानने केला विश्वविक्रम

विपुल फडके, सचिव गोवा क्रिकेट असोसिएशन म्हणाले, ‘पणजी जिमखान्यावरील पहिला सराव सामना आज झाला. एक नोव्हेंबरपासून भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सामने खेळविण्याचे नियोजन होते, मात्र क्युरेटर आणि ग्राऊंडसमन यांच्या अथक परिश्रमामुळे खेळपट्टी आणि मैदान दोन दिवस अगोदर सज्ज झाले ही उल्लेखनीय बाब आहे.’’

राज्य पातळीवरील आगामी मोसमात या मैदानावर क्लब पातळीवरील सामने खेळविण्याचे जीसीएचे नियोजन आहे. त्यापूर्वी गोव्याच्या २५ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील संघाचे काही सराव सामने या मैदानावर होतील. पूर्वी हे मैदान गोव्याच्या रणजी सामन्यांचे मुख्य केंद्र होते, परंतु जानेवारी २००६ नंतर या मैदानावर रणजी करंडक क्रिकेट सामना झालेला नाही. भविष्यात या ऐतिहासिक मैदानावर पुन्हा राष्ट्रीय क्रिकेट खेळले जाण्याचे संकेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com