Goa Professional League final match result 2026 Dainik Gomantak
क्रीडा

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Sporting Club de Goa winner: डॉयल अल्विस याच्या शानदार तीन गोलांच्या बळावर स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने सोमवारी कळंगुट असोसिएशनला ३-१ फरकाने नमवून गोवा प्रोफेशनल लीग विजेतेपदाची हॅटट्रिक साधली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: डॉयल अल्विस याच्या शानदार तीन गोलांच्या बळावर स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने सोमवारी कळंगुट असोसिएशनला ३-१ फरकाने नमवून गोवा प्रोफेशनल लीग विजेतेपदाची हॅटट्रिक साधली. सामना कळंगुट येथील पोरियाट मैदानावर झाला.

स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाचे आता २० सामन्यांतून सर्वाधिक ४७ गुण झाले आहेत. त्यांना गाठणे आता क्लब द साळगावकर (२१ सामन्यांतून ४३ गुण) व धेंपो स्पोर्टस क्लब (२० सामन्यांतून ४१ गुण) या संघांना शक्य होणार नाही. त्यामुळे अखेरच्या फेरीत एफसी गोवाविरुद्धचा सामना स्पोर्टिंग क्लब द गोवा संघासाठी आता केवळ औपचारिकता असेल. गतविजेत्यांना स्पर्धेतील १४ वा विजय मिळवून देताना डॉयल याने अनुक्रमे ४५+१, ५० व ९०व्या मिनिटास गोल केला. कळंगुट असोसिएशनची पिछाडी ९०+५व्या मिनिटास नायजेल सिल्व्हेरा याने कमी केली. कळंगुट संघाचा हा सातवा पराभव ठरला. त्यामुळे २१ लढतीनंतर त्यांचे ३२ गुण कायम राहिले.

स्पर्धेतील अन्य एका सामन्यात म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर एफसी गोवाने सेझा फुटबॉल अकादमीचे कडवे आव्हान पिछाडीवरून २-१ फरकाने परतावून लावले. अमन राजभर याने ३५व्या मिनिटास सेझा अकादमीसाठी गोल केल्यानंतर ब्रायसन परेरा याने ५४व्या, तर सिटरॉय कार्व्हालो याने ८९व्या मिनिटास गोल करून एफसी गोवाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेतील अकराव्या विजयामुळे एफसी गोवाचे २० सामन्यांतून ३६ गुण झाले, तर आठव्या पराभवामुळे सेझा अकादमीच्या २४ गुणांत फरक पडला नाही.

सलग तिसऱ्यांदा यश

स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने २०२५-२६ पूर्वी २०२३-२४ व २०२४-२५ मोसमात गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धा जिंकली होती. एकंदरीत त्यांनी २००६ पासून नवव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम साधला आहे. सलग तीन वेळा प्रो-लीग जिंकणाऱ्या चर्चिल ब्रदर्स, साळगावकर एफसी व धेंपो क्लबची त्यांनी आता बरोबरी साधली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT