South Korea vs Portugal Dainik Gomantak
क्रीडा

South Korea vs Portugal: रोनाल्डोच्या पोर्तुगालला धक्का देत दक्षिण कोरिया 'राऊंड ऑफ 16'मध्ये दाखल

अखेरच्या ग्रुपलढतीत 2-1 गोलफरकाने बलाढ्य पोर्तुगालवर मात, भरपाई वेळेत नोंदवला दुसरा गोल

Akshay Nirmale

South Korea vs Portugal: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत ग्रुप एचमधील पोर्तुगाल विरूद्ध दक्षिण आफ्रिका सामना चुरशीचा झाला. कोरियन संघाचे खेळाडू विजयासाठीच त्वेषाने खेळताना दिसले. पुर्णवेळेत हा सामना 1-1 असा बरोबरीत होता. पण भरपाई वेळेतील खेळाला सुरवात होताच पहिल्यात मिनिटाला (90+1) कोरियाच्या हवांग ही चॅन याने गोल करत दक्षिण कोरियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हा सामना कोरियाने 2-1 गोलफरकाने जिंकला.

या विजयाने साऊथ कोरियाने ग्रुप एच मध्ये उलथापालथ करून ठेवली. या विजयामुळे कोरियाचा संघ गुणतक्क्यात थेट दुसऱ्या स्थानावर पोहचला असून त्यामुळे कोरियाचा राऊंड ऑप 16 या फेरीत प्रवेश झाला आहे.

याच ग्रुपमध्ये याच सामन्यावेळी दुसरा सामना उरूग्वे विरूद्ध घाना असा सुरू होता. त्या सामन्यात उरूग्वेने घाना संघाला 2-0 अशा गोलफरकाने पराभूत केले. त्यामुळे उरूग्वे आणि दक्षिण कोरियाचे गुण समान झाले. पण सरासरीच्या जोरावर दक्षिण कोरिया उजवा ठरल्याने त्यांना पुढील फेरीत जाण्याची संधी मिळाली.

(FIFA World Cup 2022)

सामन्याला सुरवात होताच पाचव्याच मिनिटाला पोर्तुगालच्या रिकार्डो होर्ता याने गोल नोंदवल पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली. होर्ता याने 2014 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याला आज संधी मिळाली आहे. आणि त्याने या संधीचे सोने केले.

तथापि, पोर्तुगालची ही आघाडी फार काळ टिकली नाही. 27 व्या मिनिटाला दक्षिण कोरियाच्या किम युंग ग्वोन याने गोल करत कोरियाला बरोबरी साधून दिली. ग्वोन याचा हा या वर्ल्डकपमधील पहिला गोल ठरला. त्याने गत वर्ल्डकप स्पर्धेत जर्मनीविरोधातही गोल केला होता.

दरम्यान, पुर्णवेळेत सामन्यात हीच बरोबरी कायम राहिली होती. त्यानंतर भरपाई वेळेत हवांग ही चॅन याने गोल नोंदवत पोर्तुगालवर धक्कादायक विजयाची नोंद केली. या विजयाने कोरियाला बाद फेरीची संधी मिळाली आहे.

दरम्यान, या सामन्यापुर्वीच पोर्तुगालने दोन सामने जिंकून सहा गुण कमावले आहेत. त्यामुळे ते गुणतक्क्यात ग्रुप एच मध्ये टॉपवर आहेत. पोर्तुगाल आधीच राऊंड ऑफ सिक्सटीनमध्ये पोहचला आहे. तर कोरियाकडे केवळ एक गुण होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जाहिराती थांबवल्या, कार्यक्रमही रद्द! गोवा पोलिसांच्या निर्देशानंतर 'टेल्स ऑफ कामसूत्रा'वर पडदा; आयोजकांनी व्यक्त केली दिलगिरी

Delhi Red Fort Blast: 2023 पासून दिल्ली 'टार्गेट'वर! बॉम्बस्फोटाची तयारी 2 वर्षांपासून सुरू होती; धक्कादायक खुलासा समोर

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

Bicholim News:डिचोली शहराची सुरक्षा बेभरवशाची; 1 कोटी रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 'शोभेची वस्तू'!

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT