IND vs BAN: भारत-बांगलादेश मालिकेपूर्वी संघात मोठा बदल, हा धाकड बनला नवा 'कर्णधार'

IND vs BAN 1st Odi: भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशमध्ये तीन सामन्यांच्या वनडे आणि दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयारी सुरु केली आहे.
Bangladesh cricket team
Bangladesh cricket teamDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

IND vs BAN 1st Odi Match: भारतीय संघाने बांगलादेशमध्ये तीन सामन्यांच्या वनडे आणि दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयारी सुरु केली आहे. उभय संघांमधील वनडे मालिकेतील पहिला सामना ढाका येथे 4 डिसेंबर रोजी होणार आहे. या सामन्यांपूर्वी एक मोठी अपडेट समोर येत आहे. वनडे मालिकेसाठी एका संघाने नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. टी-20 विश्वचषकात भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात हा खेळाडू खूप यशस्वी ठरला होता.

या फलंदाजाला नवा कर्णधार करण्यात आला

बांगलादेश संघाचा कर्णधार तमीम इक्बाल मांडीच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. तमिम इक्बालच्या जागी लिटन दासला वनडे मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) शुक्रवारी याची घोषणा केली. लिटन दासने याआधी बांगलादेशचे (Bangladesh) T20 फॉरमॅटचे नेतृत्व केले आहे.

Bangladesh cricket team
IND A vs BAN A: जयस्वाल-ईश्वरनचा शतकी धमाका; टीम इंडियाने उभारला 400 पेक्षा जास्त धावांचा डोंगर

सराव सामन्यात दुखापत झाली

30 नोव्हेंबर रोजी शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर झालेल्या सराव सामन्यात तमीम इक्बालला दुखापत झाली होती. भारत (India) आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 14 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. तत्पूर्वीच, तमीम पहिल्या कसोटीतूनही बाहेर जाऊ शकतो, असे मानले जात आहे. त्याचवेळी, बांगलादेश आणि भारत यांच्यातील पहिले दोन एकदिवसीय सामने 4 आणि 7 डिसेंबर रोजी मीरपूर, ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. तिसरा एकदिवसीय सामना 10 डिसेंबर रोजी चितगावच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर होणार आहे.

हा वेगवान गोलंदाज आधीच बाद झाला

बांगलादेश संघाचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदलाही पाठदुखीमुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यातून मुकावे लागले आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लामचा तस्किनचा बॅकअप म्हणून एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. तस्किन अहमद हा संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे.

Bangladesh cricket team
IND A vs BAN A: भारताने बांगलादेशला 112 धावांत गुंडाळले; सलामीवीरांचीही नाबाद अर्धशतके

एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश संघ

नजमुल हुसेन शांती, यासिर अली, आसिफ हुसेन, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन, शकीब अल हसन, अनामूल हक (विकेटकीपर), लिटन दास (क), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन (विकेटकीपर), इबादत हुसेन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नसम अहमद, तस्किन अहमद.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Five Centuries In A Single ODI Match
Asian Games 2026, India vs Afghanistan Quarterfinal Match
IND vs WI ODI Live Streaming
IND vs WI Rohit Sharma Virat Kohli Records
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com