'आधी मुलाचा गळा घोटला, कीटकनाशक पिऊन संपवले जीवन'; बाप-लेक मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती उघड, चिठ्ठीमुळे उलगडले रहस्य

Bicholim Father Son Death Case: मुलाची गळा घोटून हत्या केल्यानंतर वडिलांनी कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Bicholim father son death case
Bicholim father son death caseDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: येथील बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे. मुलाची गळा घोटून हत्या केल्यानंतर वडिलांनी कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शवचिकित्सा अहवालातही तसे स्पष्ट केले आहे. मुलाची हत्या करण्यामागील कारण अस्पष्ट असले, तरी रागाच्या भरात वडिलांनी मुलाचा गळा दाबला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शवचिकित्सा केल्यानंतर (मंगळवारी) दुपारी संजय आणि संचित म्हापसेकर यांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. सायंकाळी पाजवाडा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संजय यांची एकमेव मुलगी सिमरन हिने वडील आणि धाकट्या भावाच्या पार्थिवाला अग्नी दिला.

‘मुलाच्या बेशिस्त वागणुकीमुळे मला टोकाचे पाऊल उचलावे लागले’, असे संजय म्हापसेकर यांनी लिहिलेल्या ‘सुसाईड नोट’मधून स्पष्ट होत आहेत. नाईकनगर-बोर्डे येथील संजय म्हापसेकर आणि त्यांचा १४ वर्षीय मुलगा संचित या दोघांचेही मृतदेह (सोमवारी) सायंकाळी घरात संशयास्पदरित्या आढळून आले होते. संजय यांनी आत्महत्या केल्याचे जवळपास स्पष्ट झाले होते.

मात्र, मुलाच्या मृत्युप्रकरणी गूढ निर्माण झाले होते. फॉरेन्सिक पथकाने तपास केल्यानंतर सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ते गोमेकॉत पाठविले होते. त्यानुसार मुलगा संचित याला मारहाण केल्यानंतर गळा आवळून खून केल्याचे शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट झाले आहे.

मुलाची हत्या केल्यानंतर संजय यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी संजय यांनी घरात १२ पानी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक हरिष मडकईकर, डिचोलीच्या पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. आणि पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Bicholim father son death case
एकाच खोलीत बाप-लेकाचा संशयास्पद मृत्यू! डिचोली परिसरात खळबळ; मुलाच्या नाकातोंडातून रक्तस्राव, गूढ वाढले

काय लिहिले होते चिठ्ठीत?

संजय म्हापसेकर यांनी चिठ्ठीत काय लिहिलेय, याविषयी सविस्तर माहिती उघड केलेली नाही. मात्र, बाप आणि मुलाचे पटत नव्हते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. ‘संचित हा मस्तीखोर असून, तो काहीच ऐकत नाही. त्याच्या वागणुकीचा मला पश्चाताप होत आहे. त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, तर उलट तोच पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देत होता.

दोनवेळा त्याने माझ्याविरोधात पोलिसांत तक्रारही केली आहे. मुलाच्या अशा वागणुकीमुळे मी प्रचंड तणावाखाली आलो आहे. मुलाच्या पश्चातापाने जीवाचे बरे-वाईट केले, तर भविष्यात माझ्या मुलीला म्हणजेच स्वतःच्या बहिणीसाठी तो डोकेदुखी ठरू शकतो.

त्यामुळे माझ्याकडे अविचार करण्यावाचून अन्य पर्याय नाही’ असा मजकूर चिठ्ठीत असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. यापुढे मुलीने कोणत्याही तणावाखाली न राहता बिनधास्त रहावे. माझी मालमत्ताही तिनेच सांभाळावी, असा उल्लेखही चिठ्ठीत नमूद केल्याची माहिती मिळाली आहे.

Bicholim father son death case
Goa Russian Murder: एकाच नावाच्या दोन रशियन महिलांची का केली हत्या? मारेकऱ्याच्या आईशी कनेक्शन! खुनाचं गुढ उकललं!

सध्या होते एकाकी

संजय म्हापसेकर यांच्याकडे डिचोली भाजप मंडळाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी होती. भाजपची प्रत्येक सभा आणि कार्यक्रमात ते सक्रिय असायचे. मात्र, अलीकडे ते भाजपच्या कार्यक्रमात दिसत नव्हते. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते, हे स्पष्ट झाले. मुलाच्या वागणुकीमुळे की अन्य कोणत्या तरी वैयक्तिक कारणामुळे संजय तणावाखाली होते. मात्र ते स्पष्ट झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com