Vijay Hazare Trophy Final: तब्बल 14 वर्षानंतर सौराष्टची बाजी; महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचे शतक वाया

सौराष्ट्रच्या शेल्डन जॅक्सनची नाबाद शतकी खेळी
Vijay Hazare Trophy Final Match
Vijay Hazare Trophy Final MatchDainik Gomantak
Published on
Updated on

Saurashtra vs Maharashtra: विजय हजारे ट्रॉफीसाठी झालेल्या महाराष्ट्र विरूद्ध सौराष्ट्र या अंतिम सामन्यात तब्बल 14 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ बाजूला सारत सौराष्ट्र संघाने बाजी मारली. महाराष्ट्राने निर्धारित 50 षटकांत नऊ विकेट गमावून 248 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सौराष्टने हे लक्ष्य 46.3 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात पुर्ण केले.

(Vijay Hazare Trophy Final)

Vijay Hazare Trophy Final Match
Dwayne Bravoचा आयपीएलला अलविदा! आता CSK संघात सांभाळणार महत्त्वाची जबाबदारी

या आधी सौराष्ट्रचा संघ 2007-08 च्या हंगामात चॅम्पियन ठरला होता. महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या कॅप्टन इनिंग्जवर सौराष्ट्रच्या शेल्डन जॅक्सनची खेळी भारी पडली. ऋतुराजने 108 धावांची खेळी केली तर शेल्डनने 136 चेंडुत 133 धावा केल्या. या स्पर्धेत सौराष्ट्रच्या वेगवान गोलंदाजांचा तर महाराष्ट्राच्या फलंदाजांचा दबदबा राहिला.

सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने नाणेफेक जिंकून गोलंदाजीची निर्णय घेतला होता. महाराष्ट्राची सुरवात खराब झाली. पवन शाह चार धावांवर तर सत्यजीत बच्छाव सत्तावीस धावांवर बाद झाले. अंकित बावने देखील 16 धावा करून परतला. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने 131 चेंडूत सात चौकार आणि चार षटकार ठोकत 108 धावा केल्या. या स्पर्धेतील ऋतुराजचे हे सलग तिसरे शतक आहे. यापुर्वी त्याने उत्तरप्रदेशविरोधात नाबाद 220 तर आसाम विरोधात 168 धावा केल्या होत्या. तसेच रेल्वेज विरोधात त्याने नाबाद 124 धावा केल्या होत्या.

Vijay Hazare Trophy Final Match
Colombia Football: काळीज हादरवणारी घटना! 22 वर्षीय फुटबॉलरचे अर्जेंटिनात ट्रेनिंगदरम्यान निधन

249 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्रच्या शेल्डन जॅक्सनने हार्विक देसाईसोबत पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी केली. हार्विकने अर्धशतकी खेळी केली. शेल्डनने नाबाद 133 धावा सौराष्ट्रला विजय मिळवून दिला. सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकट याने या स्पर्धेत 19 विकेट घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com