South Africa Twitter
क्रीडा

World Cup 2023: श्रीलंकेची 429 धावांचा पाठलाग करताना झुंज अपयशी! द. आफ्रिकेचा 102 धावांनी दणदणीत विजय

Pranali Kodre

ICC ODI World Cup 2023, South Africa vs Sri Lanka Result:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्ध १०२ धावांनी विजय मिळवला आहे. दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडला. स्पर्धेतील हा एकूण चौथा सामना असला, तरी या दोन्ही संघांचा पहिला सामना होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने विजयासह यंदाच्या वर्ल्डकपची मोहिम सुरू केली आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेसमोर ४२९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ ४४.५ षटकात ३२६ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने सहज विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या ४२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. त्यांनी पाथम निसंकाची पहिली विकेट शुन्यावरच दुसऱ्या षटकात गमावली. मात्र, त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कुशल मेंडिसने आक्रमक पवित्रा घेतला. त्याने तुफानी फलंदाजी करत २५ चेंडूतच अर्धशतक केले.

विशेष म्हणजे त्याने अर्धशतक केले, तेव्हा सलामीला खेळायला आलेला कुशल परेरा शुन्यावरच फलंदाजी करत होता. अखेर त्याला ७ धावांवर ८ व्या षटकात यान्सिनने बाद केले. मात्र मेंडिसने त्याचा खेळ सुरू ठेवला होता. पण त्याचे हे वादळ कागिसो रबाडाने रोखले. त्याने मेंडिसला बाद केले. मेंडिसने ४२ चेंडूत ४ चौकार आणि ८ षटकारांसह ७६ धावा केल्या.

मेंडिसला सदिरा समरविक्रमाने चांगली साथ दिली होती. पण तो बाद झाल्यानंतर समरविक्रमाही २३ धाावंवर बाद झाला. पाठोपाठ धनंजय डी सिल्वाही ११ धावा करून बाद झाला. पण यानंतर चरिथ असलंका आणि कर्णधार दसून शनका यांची जोडी जमली. या दोघांनी श्रीलंकेचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

यादरम्यान असलंकाने अर्धशतकही केले. तोही आक्रमक खेळत होता. मात्र त्यांची जोडी ३२ व्या षटकात लुंगी एन्गिडीने तोडली. त्याने असलंकाला झेलबाद केले. असलंका ६५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ७९ धावा करून बाद झाला.

त्या पुढच्याच षटकात दुनिथ वेलालागे शुन्यावर बाद झाला. पण, शनकाने आपली खेळ सुरु ठेवला होता. त्याने अर्धशतकही पूर्ण केले. मात्र, त्याला केशव महाराजने ६८ धावांवर त्रिफळाचीत केले. अखेरिस कसून रजिताने ३३ धावांची झुंज दिली. मात्र, दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला रोखण्यात यश मिळवले.

दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएट्झीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच केशव महाराज, कागिसो रबाडा आणि मार्को यान्सिन यानी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच लुंगी एन्गिडीने १ विकेट घेतली.

तत्पुर्वी, श्रीलंकेने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने कर्णधार तेंबा बाऊमाची विकेट दुसऱ्याच षटकात गमावली होती. मात्र, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी टॉप गिअर टाकला.

दक्षिण आफ्रिकेकडून आधी सलामीला फलंदाजीला आलेल्या क्विंटन डी कॉकने ८४ चेंडूत १०० धावांची शतकी खेळी केली, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील रस्सी वॅन दर ड्यूसेनने ११० चेंडूत १०८ धावा केल्या. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी २०४ धावांची भागीदारीही झाली.

यानंतर चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या एडेन मार्करमने तुफानी खेळ करताना ५४ चेंडूत १०६ धावा केल्या. तसेच क्लासेनने २० चेंडूत ३२ धावा केल्या. अखेरीस मिलरने आक्रमक खेळताना २१ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या, तर मार्को यान्सिनने १२ धावा केल्या.त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने ५० षटकात ५ बाद ४२८ धावांचा टप्पा गाठला.

श्रीलंकेकडून दिलशान मदुशनकाने २ विकेट्स घेतल्या. तसेच रजिथा, मथिशा पाथिराना आणि दुनिथ वेलालागे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT