सचिन तेंडुलकर म्हणतोय, भारताबाबत शंकाच नाही, पण 'हे' तीन संघही World Cup 2023 साठी प्रबळ दावेदार

Sachin Tendulkar: वर्ल्डकप 2023 च्या प्रबळ दावेदार संघांबद्दल सचिन तेंडुलकरने त्याचे मत मांडले आहे.
Sachin Tendulkar | World Cup 2023
Sachin Tendulkar | World Cup 2023ICC
Published on
Updated on

Sachin Tendulkar predicts four teams will reach semi-finals of ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली आहे. १० संघात रंगणाऱ्या या स्पर्धेबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. दरम्यान, या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी प्रबळ दावेदार संघांबद्दलही अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी अंदाज व्यक्त केले आहेत. आता भारताचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही याबद्दल त्याचे मत मांडले आहे.

वर्ल्डकप 2023 च्या पहिल्या सामन्यावेळी सचिन तेंडुलकर वर्ल्डकपची ट्रॉफी मैदानात घेऊन आला होता. त्यानंतर त्याने अहमदाबादमध्ये रंगलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सलामीच्या सामन्यावेळी समालोचनही केले.

यावेळी त्याने कोणते चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतात याचे अंदाजही सांगितले. त्याने भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार संघ प्रबळ दावेदार असल्यचे मत मांडले आहे.

Sachin Tendulkar | World Cup 2023
World Cup 2023: वनडे इतिहासात 4658 सामने झाले, पण हा पराक्रम करणारा इंग्लंड बनला पहिलाच संघ

तो म्हणाला, 'वर्ल्डकप ट्रॉफी मैदानात आणणे शानदार अनुभव होता, आम्ही येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळलो होतो. ती रात्र आमच्यासाठी खूप खास होती. येथे त्याच स्टेडियमवर 12 वर्षांनंतर पुन्हा आल्याने छान वाटतेय.'

12 वर्षांपूर्वी 2011 वर्ल्डकपमध्ये भारताने अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली होती. हा वर्ल्डकप भारताने जिंकला होता.

सचिन पुढे म्हणाला, 'काहीतरी खास घडले होते. 2011 पूर्वी यजमान संघाने वर्ल्डकप स्पर्धा जिंकली नव्हती. त्यानंतर प्रत्येक यजमान संघ वर्ल्डकप जिंकला. भारत आता पुन्हा यजमान आहे, त्यामुळे यंदा आशा आहेच.'

'मला आशा आहे, कारण आपला संघ खूप चांगले क्रिकेट खेळत आहे आणि जर संघाने गोष्टी सरळ आणि साध्या ठेवल्या, तसेच जर मुळ गोष्टींवर विश्वास ठेवला, तर त्यांच्याकडे चांगली संधी आहे.'

'आपल्या संघाकडे चांगली फलंदाजी फळी आहे, गोलंदाजी करणारे चांगले अष्टपैलू आहेत. आपल्याकडे चांगला समतोल आहे.'

Sachin Tendulkar | World Cup 2023
World Cup 2023: ऑस्ट्रेलिया, भारत अन् इंग्लंड...चार वर्ल्डकप एक योगायोग! पहिल्याच सामन्यात ठरला विश्वविजेता?

त्याचबरोबर उपांत्य फेरीत जाऊ शकणाऱ्या प्रबळ दावेदारांबद्दल सचिन म्हणाला, 'कोणत्याही शंकेशिवाय भारतीय संघ. आपल्या संघात खूप खूप चांगला समतोल आहे. ऑस्ट्रेलियाबाबत सांगायचे झाल्यास त्यांच्याकडेही चांगला समतोल आहे.'

'तिसऱ्या संघाबद्दल मी म्हणेल इंग्लंड. इंग्लंड खूप मजबुत संघ असून त्यांच्याकडे अनुभवी आणि नव्या खेळाडूंचे चांगले संमिश्रण आहे. माझा चौथा संघ न्यूझीलंड असेल. त्यांनी 2015 आणि 2019 मध्ये अंतिम सामने खेळले आहेत. जर तुम्ही त्यांची कामगिरी पाहिली असेल, तर न्यूझीलंडने त्यांनी जागतिक स्पर्धांमध्ये नेहमीच चांगली कामगिरी केली आहे आणि मला वाटते ते उपांत्य सामन्यात जातील.'

दरम्यान, वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला ९ विकेट्सने पराभूत करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com