Rohit Sharma - Rahul Dravid
Rohit Sharma - Rahul Dravid PTI
क्रीडा

SA vs IND: केपटाऊनमध्ये टीम इंडियाला पहिल्या विजयाची प्रतिक्षा, 31 वर्षांपासून अशी आहे आकडेवारी

Pranali Kodre

South Africa vs India, 2nd Test at Cape Town:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (3 जानेवारी) सुरु होणार आहे. हा सामना केपटाऊनमधील न्युलँड्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याला बुधवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरुवात होणार आहे.

दरम्यान, या सामन्यात विजय मिळवून मालिका वाचवण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. कारण या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकने जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

त्यामुळी ही मालिका जिंकण्याची संधी भारतीय संघाकडे नाही, मात्र मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारताला विजय मिळवणे गरजेचेच आहे. जर हा सामना अनिर्णित राहिला किंवा भारताने पराभव स्विकारला, तरी दक्षिण आफ्रिका मालिका जिंकेल.

तथापि, जर भारताने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्यात यश मिळवले, तर हा भारताचा केपटाऊनमधील पहिलाच कसोटी विजय ठरेल. 1993 पासून म्हणजेच गेल्या 31 वर्षात भारताने केपटाऊनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आत्तापर्यंत एकदाही कसोटीत विजय मिळवलेला नाही.

भारताने गेल्या 31 वर्षात केपटाऊनला 6 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील दोन सामने अनिर्णित राहिले आहेत, तर 4 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवले आहेत. विशेष म्हणजे भारताने हे सर्व सामने जानेवारी महिन्यात खेळले आहेत.

साल 1997, 2007, 2018 आणि 2022 या चार वर्षी केपटाऊनला झालेल्या कसोटी सामन्यांत भारताने पराभव स्विकारला आहे. तसेच 1993 आणि 2011 साली केपटाऊन कसोटी अनिर्णित राखण्यात भारताला यश मिळाले आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने आत्तापर्यंत केपटाऊनला 59 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 27 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 21 सामने पराभूत झाले आहेत. त्याचबरोबर 11 सामने अनिर्णित राहिले आहेत.

तसेच भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आत्तापर्यंत एकूण 43 कसोटी सामने झाले आहेत. त्यातील 15 सामने भारताने आणि 18 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. त्याचबरोबर 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.

दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान

  • दक्षिण आफ्रिका - डीन एल्गार (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, झुबेर हमझा, मार्को यान्सिन, केशव महाराज, एडेन मार्करम, विआन मुल्डर, लुंगी एन्गिडी, कीगन पीटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT