SA vs IND: टीम इंडियाची चिंता वाढली! अनुभवी गोलंदाजाला दुखापत, दुसऱ्या कसोटीत खेळण्यावरही प्रश्नचिन्ह

Shardul Thakur: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे.
Team India
Team IndiaPTI

India team faced injury scare ahead of 2nd Test against South Africa:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने डावाने जिंकला होता. त्यानंतर आता दुसरा सामना नवीन वर्षाच्या सुरुवातीला 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान केपटाऊनला होणार आहे.

या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. पीटीआयने भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला सराव सत्रादरम्यान नेटमध्ये फलंदाजी करताना दुखापत झाली आहे. त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे.

दरम्यान, अद्याप त्याची दुखापत कितपत गंभीर आहे, याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. मात्र पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार तो केपटाऊनला होणाऱ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

Team India
Shardul Thakur: नॉर्मल माणूस वाटला का? लॉर्ड शार्दूलने मिळवलंय थेट डॉन ब्रॅडमनच्या पंक्तीत स्थान

दरम्यान, त्याला त्याच्या या दुखापतीमुळे सराव सत्रात गोलंदाजीही करता आली नाही. त्याला फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड थ्रोडाऊन करत असताना डाव्या खांद्याला दुखापत झाली.

शार्दुल सेंच्युरियनला झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. मात्र, त्याला या सामन्यात छाप पाडण्यात अपयश आले. त्याने या सामन्यात गोलंदाजी करताना 19 षटकात 101 धावा देताना 1 विकेट घेतली. तसेच त्याने फलंदाजी करताना पहिल्या डावात 24 आणि दुसऱ्या डावात 2 धावा केल्या.

भारतीय संघात आवेश खानचा समावेश

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज आवेश खानचा समावेश करण्यात आला आहे. त्याला मोहम्मद शमीच्या जागेवर संघात सामील केले आहे. तो पहिल्या कसोटीसाठी संघाचा भाग नव्हता.

Team India
SA vs IND: द. आफ्रिकेला तगडा धक्का! धाकड वेगवान गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर, कारणही आले समोर

आता जर शार्दुल दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही, तर आवेशला दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. याशिवाय मुकेश कुमारचा देखील भारतीय संघ व्यवस्थापनाकडे पर्याय आहे.

भारतासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

दक्षिण आफ्रिकेने पहिला कसोटी सामना जिंकला असल्याने त्यांनी दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला मालिका जिंकण्याची संधी नाही.

मात्र भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवू शकतात. दुसरा सामना जर भारतीय संघ पराभूत झाला किंवा अनिर्णित राहिला, तर दक्षिण आफ्रिका ही मालिका जिंकेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com