World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 ची तयारी जोरात सुरु आहे. क्रिकेटच्या या महाकुंभात टीम इंडियाचा संघ कसा असेल? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. बीसीसीआयने अद्याप एकदिवसीय विश्वचषक संघाची घोषणा केलेली नाही.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ निवडला आहे.
त्याने 15 जणांच्या संघाची निवड केली आहे, ज्यात गांगुलीने संजू सॅमसन, तिलक वर्मा, यजुवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन यांना वगळले आहे.
सौरव गांगुलीने रोहित शर्मा (Rohit Sharma), शुभमन गिल आणि इशान किशन यांना विश्वचषक 2023 मध्ये सलामीची जोडी म्हणून निवडले आहे. मधल्या फळीत गांगुलीने विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांना स्थान दिले आहे.
अष्टपैलू खेळाडू म्हणून सौरव गांगुलीने हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांना संधी दिली आहे. त्याचबरोबर कुलदीप यादवलाही संधी दिली आहे.
गांगुलीच्या संघात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर या चार वेगवान गोलंदाजांची नावे आहेत.
रोहित शर्मा
शुभमन गिल
इशान किशन
विराट कोहली
श्रेयस अय्यर
केएल राहुल
सूर्यकुमार यादव
हार्दिक पांड्या
रवींद्र जडेजा
अक्षर पटेल
कुलदीप यादव
जसप्रीत बुमराह
मोहम्मद शमी
मोहम्मद सिराज
शार्दुल ठाकूर
एकदिवसीय विश्वचषक 2023 भारतात होणार आहे. ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून 19 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. टीम इंडिया विश्वचषकातील पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. तर दुसरा सामना 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.