Sourav Ganguly Dainik Gomantak
क्रीडा

Sourav Ganguly News: सौरव गांगुलीने राजीनाम्याच्या मुद्यावर सोडले मौन

सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) ट्वीटने अवघ्या क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली.

दैनिक गोमन्तक

सौरव गांगुलीच्या ट्वीटने अवघ्या क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे गांगुलीने आपल्या ट्विटमध्ये सूचित केले आहे. गांगुलीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. आता काहीतरी नवीन करणार असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. बीसीसीआय अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन गांगुली लवकरच एका राजकीय पक्षात सामील होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार ते भाजपमध्ये जाणार? मात्र, गांगुलीने आता या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गांगुलीने म्हटले आहे की, 'मी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही.' वृत्तसंस्था एएनआयने गांगुलीचा हवाला देत सांगितले की, मी काहीतरी सुरु करण्याची योजना आखत आहे. बीसीसीआय अध्यक्ष म्हणाले, 'मी जगभरात नवीन शैक्षणिक अ‍ॅप लाँच करत आहे. याशिवाय दुसरे काही नाही.' त्यांच्या आधी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पुष्टी केली की, गांगुलीने आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही.

सौरव गांगुलीची क्रिकेट कारकीर्द

सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) 1992 मध्ये ब्रिस्बेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर 1996 मध्ये लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. गांगुलीचा शेवटचा कसोटी सामना 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) नागपुरात झाला होता. 2007 मध्ये ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. गांगुलीने 113 कसोटीत 42.17 च्या सरासरीने 7212 धावा केल्या. त्याचबरोबर 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11363 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 41.02 होती. गांगुलीने कसोटीत 16 आणि एकदिवसीय सामन्यात 22 शतके झळकावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT