Snake Stops Tennis Match 
क्रीडा

Snake Stops Tennis Match: चालू टेनिस मॅचमध्ये विषारी साप, 40 मिनिटे खेळही थांबला; थरकाप उडवणारा Video

Snake Stops Tennis Match: डॉमिनिक थिम आणि जेम्स मॅककेब यांच्यातील लाईव्ह टेनिस सामन्यात अचानक दुसरा सर्वात विषारी साप आल्याची घटना शनिवारी घडली.

Pranali Kodre

Snake Stops Tennis Match:

टेनिसचा नवा सिजन नुकताच चालू झाला असून ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेन इंटरनॅशनल ही स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत शनिवारी एक भयभीत करणारी घटना घडली.

ऑस्ट्रेलियाचा डॉमिनिक थिम आणि या स्पर्धेतील पात्रता फेरीचा सामना ऑस्ट्रेलियन जेम्स मॅककेब या दोन खेळाडूंमध्ये एकेरी सामना सुरु होता. या सामन्यात पहिला सेट मॅककेबने ६-२ असा जिंकला होता.

त्यानंतर खेळ सुरु असलानाच अचानक टेनिस कोर्टवर एक साप सरपटत आला. त्यामुळे सर्वचजण सावध झाले. सामना सुरु असताना कोर्टच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रिक वायर्सच्या जवळ हा साप दिसला. तो ईस्टर्न ब्राऊन साप असल्याचे समजले.

खरंतर हा साप जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात विषारी साप आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून लगेचच सामना थांबवण्यात आला. काही वेळात सर्पमित्र आले आणि त्यांनी त्याला सुरक्षितरित्या पकडले. यानंतर पुन्हा सामना सुरु झाला.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की सरपटणाऱ्या विषारी प्रजातींपैकी सर्वाधिक प्रजाती ऑस्ट्रेलियामध्ये सापडतात. ऑस्ट्रेलियात अनेकदा घरातही असे साप आढळून येतात.

दरम्यान, थिम आणि मॅककेब यांच्यातील सामना नंतर पूर्ण करण्यात आला. थिमने पहिल्या सेटमधील पराभवानंतर दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुरागमन केले आणि सेट जिंकला. त्यामुळे हा सामना तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये गेला.

तिसऱ्या सेटमध्येही थिमने विजय मिळवला. त्यामुळे त्याने हा सामना जिंकत मुख्य स्पर्धेत प्रवेश केला. थिमने हा सामना 2-6, 7-6, 6-4 असा जिंकला.

थिमचा सामना नदालशी

मुख्य स्पर्धेत थिमचा एकेरीत पहिला सामना स्पेनच्या राफेल नदालशी होणार आहे. नदालचा हा स्पर्धात्मक टेनिसमध्ये जवळपास वर्षभराननंतर एकेरीचा पहिला सामना आहे.

नदाल दुखापतीमुळे गेल्या वर्षाभरात टेनिस खेळू शकलेला नाही. त्याने ब्रिस्बेन इंटरनॅशनल या स्पर्धेतून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. थिम आणि नदाल यांच्यातील सामना 2 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT