Rafael Nadal: पुनरागमनाच्या सामन्यात नदाल पराभूत! कोचसह वर्षभराने खेळला पहिला सामना, पाहा Video

Brisbane International: राफेल नदालने आपल्याच प्रशिक्षकाच्या साथील पुन्हा स्पर्धात्मक टेनिसमध्ये रविवारी पुनरागमन केले.
Rafael Nadal
Rafael NadalX/atptour
Published on
Updated on

Rafael Nadal face lost in comeback:

टेनिस जगतात सध्या स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालची मोठी चर्चा होत आहे. 37 वर्षीय नदाल जवळपास एका वर्षाने टेनिस कोर्टवर पुनरागमन करत आहे. त्याने पुनरागमनासाठी ऑस्ट्रेलियन ओपन या वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमपूर्वी ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेची निवड केली आहे.

दरम्यान, नदालने दुहेरीचा पहिला सामना खेळला. मात्र त्याला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. तो या स्पर्धेमध्ये दुहेरीत स्पेनच्याच मार्क लोपेझसह उतरला होता. विशेष म्हणजे लोपेझ नदालचा प्रशिक्षक देखील आहे. तसेच त्यांनी 8 वर्षांपूर्वी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकालाही गवसणी घातली होती.

मात्र, या स्पॅनिश जोडीला रविवारी (31 डिसेंबर) मॅक्स पर्सेल आणि जॉर्डन थॉम्पसन यांनी ब्रिस्बेन इंटरनॅशनलच्या पहिल्या फेरीत पराभवाचा धक्का दिला. पर्सेल आणि थॉम्पसन यांनी नदाल-लोपेझ जोडीला 6-4, 6-4 अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले.

Rafael Nadal
Novak Djokovic vs Carlos Alcaraz: 20 वर्षांच्या अल्कारेजने हरवल्यावर जोकोविच म्हणतोय, 'त्याच्याकडे फेडरर, राफा अन् माझे...'

नदाल वर्षाने उतरला मैदानात

नदालने अखेरचा ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेत खेळला होता. त्या स्पर्धेत तो दुसऱ्या फेरीनंतर बाहेर झाला होता. त्याला हिप फ्लेक्सरची समस्या झाली होती. त्यानंतर तो बराच वेळ दुखापतीशी सामना करत होता. त्याला जूनमध्ये शस्त्रक्रियाही करून घ्यावी लागली. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्थरावर टेनिस खेळता आले नाही.

दरम्यान, पुनरगमनाच्या सामन्यात त्याने नेहमीसारखेच पुन्हा अचूक रिटर्न्स आणि शॉट्स पाहायला मिळाले. मात्र, ऑस्ट्रेलियन जोडी पार्सेल आणि थॉम्पसन या जोडीने 64 मिनिटात नदाल आणि लोपेझ जोडीला पराभवाचा धक्का दिला.

Rafael Nadal
Rafael Nadal: तो परत येतोय! लाल मातीच्या बादशाहने केली कमबॅकची घोषणा

नदाल एकेरीतही खेळणार

नदाल ब्रिस्बेन इंटरनॅशनलमध्ये एकेरीतही खेळणार आहे. त्याचा एकेरीतील पहिला सामना ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमविरुद्ध होणार आहे. हा सामना 2 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.

ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही खेळणार नदाल

22 ग्रँडस्लॅम विजेत्या नदालने असेही सांगितले आहे की तो यावर्षी मेलबर्नला होणाऱ्या वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळणार आहे. नदाल 23 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या यंदा प्रयत्नात असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com