Novak Djokovic vs Carlos Alcaraz
Novak Djokovic vs Carlos AlcarazDainik Gomantak

Novak Djokovic vs Carlos Alcaraz: 20 वर्षांच्या अल्कारेजने हरवल्यावर जोकोविच म्हणतोय, 'त्याच्याकडे फेडरर, राफा अन् माझे...'

Wimbledon 2023: विम्बल्डन 2023 फायनलमध्ये अल्कारेजकडून पराभूत झाल्यानंतर जोकोविचने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

Novak Djokovic praise Carlos Alcaraz After Wimbledon 2023 Final : रविवारी सार्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचला विम्बल्डन 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसला. स्पेनच्या अव्वल मानांकित कार्लोस अल्कारेजने त्याला पराभूत केले.

20 वर्षांच्या अल्कारेजने अंतिम सामन्यात जोकोविचला ५ सेटमध्ये कडवी झुंज देत  1-6, 7-6(6), 6-1, 3-6, 6-4 असे पराभूक केले. विशेष म्हणजे गेल्या २० वर्षांच्या कालावधीत नोव्हाक जोकोविच, रॉजर फेडरर, अँडी मरे आणि राफेल नदाल यांच्याव्यतिरिक्त विजेता विम्बल्डनला मिळाला आहे. त्यामुळेच अल्कारेजचा हा विजय विशेष मानला जात आहे.

त्याचे या विजेतेपदाबद्दल अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी जोकोविचनेही तोंडभरून कौतुक केले आहे.

मला वाटते लोक गेल्या 12 महिन्यांपासून त्याच्याबद्दल चर्चा करत आहेत की त्याच्यामध्ये रॉजर (फेडरर), राफा (राफेल नदाल) आणि माझ्यातील काहीतरी घटक आहेत. मी याच्याही अगदी सहमत आहे. माझ्यामते त्याच्याकडे आमच्या तिघांमधील सर्वोत्तम घटक आहेत.
नोव्हाक जोकोविच, सार्बियन टेनिसपटू
Novak Djokovic vs Carlos Alcaraz
Wimbledon 2023: अल्कारेज नवा विम्बल्डन विजेता! दिग्गज जोकोविचला थरारक फायनलमध्ये पराभवाचा धक्का

अंतिम सामन्यानंतर अल्कारेजबद्दल बोलताना जोकोविच म्हणाला, 'त्याच्याकडे मानसिक कणखरता आहे. तसेच 20 वर्षांच्या वयाच्या दृष्टीने तो बराच परिपक्वही आहे. त्याच्याकडे प्रतिस्पर्धा करण्याची, लढण्याची आणि अविश्वसणीय बचावात्मक खेळाची स्पॅनिश मानसिकता आहे, जशी गेल्या अनेक वर्षात मी राफाबाबत पाहिली आहे.'

'मला वाटते की त्याच्याकडे चांगले स्लायडिंग बॅकहँडचे फटके आहेत, जे काहिसे माझ्यासारखे आहेत. दोन्ही हातांनी बॅकहँड्स, बचाव, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, त्याच्याकडे आहे. मला वाटते माझ्या स्वत:ची ही अनेकवर्षे ताकद होती. पण त्याच्याकडेही ती आहे.'

'प्रामाणिकपणे सांगायचे, तर मी त्याच्यासारख्या खेळाडूविरुद्ध कधीही खेळलो नव्हतो. रॉजर आणि राफाकडे नक्कीच त्यांची ताकद आणि कमजोरी आहे. कार्लोस परिपूर्ण खेळाडू आहे. माझ्यामते परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता ही त्याच्यासाठी दीर्घकाळ खेळत राहण्यासाठी आणि यशस्वी कारकिर्द घडवण्याची गुरुकिल्ली आहे.'

Novak Djokovic vs Carlos Alcaraz
Novak Djokovic: 'आय लव्ह यू...', कुटुंबाकडे पाहताच जोकोविचला अश्रू अनावर, पाहा Video

याशिवाय जोकोविचने अल्कारेजचे आणि त्याच्या टीमचेही विजेतेपदाबद्दल अभिनंदन केले. त्याचबरोबर जोकोविच कुटुंबाचे आणि त्याच्या टीमचे आभार मानताना मात्र भावनिक झाला होता. त्याचे डोळेही त्यावेळी पाणावले.

अल्कारेजची स्वप्नपूर्ती

दरम्यान, विजेतेपद जिंकल्यानंतर अल्कारेजने म्हटले की हा त्याच्यासाठी स्वप्नपूर्ती करणारा क्षण आहे. तसेच त्याने त्याच्या टीमचेही कौतुक केले आहे.

हा माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे नक्कीच हा चांगला विजय आहे. पण जरी मी पराभूत झालो असतो, तरी मला इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल माझा अभिमान वाटला असता. या सुंदर स्पर्धेत इतिहास घडवणे, आपल्या या खेळाच्या दिग्गजाविरुद्ध अंतिम सामना खेळणे हा शानदार क्षण आहे.
कार्लोस अल्कारेज, स्पेनचा टेनिसपटू

अल्कारेजसाठी हे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने गेल्यावर्षी अमेरिकन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. दरम्यान, या विजेतेपदानंतर अल्कारेज अव्वल क्रमांकावर कायम राहाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com