Team India Dainik Gomantak
क्रीडा

Best Cricketer: 2022 च्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूच्या शर्यतीत केवळ एक 'भारतीय', नाव जाणून तुम्ही म्हणाल...

ICC Best Cricketer Of The Year: आता 2022 हे वर्ष शेवटच्या टप्प्यावर आहे. या वर्षात क्रिकेटमध्ये अनेक विक्रम झाले आणि मोडले गेले.

दैनिक गोमन्तक

ICC Best Cricketer Of The Year: आता 2022 हे वर्ष शेवटच्या टप्प्यावर आहे. या वर्षात क्रिकेटमध्ये अनेक विक्रम झाले आणि मोडले गेले. भारतीय खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली आहे. मात्र, वर्षभरात पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2022 च्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंचे नामांकन केले आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या यादीत फक्त एक भारतीय आहे आणि ती ही महिला खेळाडूंमध्ये आहे.

स्मृती मानधना ही एकमेव भारतीय

सलामीवीर स्मृती मानधना ही ICC सर्वोत्कृष्ट क्रिकेटर ऑफ द इयर-2022 पुरस्काराच्या शर्यतीत महिला आणि पुरुष या दोन्ही प्रकारात एकमेव भारतीय आहे. मानधनाचा सामना इंग्लंडच्या नॅट सायव्हर, न्यूझीलंडच्या अमेलिया केर आणि ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीशी होणार आहे. पुरुष गटात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam), इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स, झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा आणि न्यूझीलंडचा कसोटी कर्णधार टीम साऊदी या शर्यतीत आहेत.

स्टोक्स दोन प्रकारात मोडतो

इंग्लंडचा (England) अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला एक नव्हे तर दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. तो केवळ 2022 च्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूच्या शर्यतीत नाही तर वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटूच्या शर्यतीतही आहे. त्याच्याशिवाय इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो, ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांचाही या शर्यतीत समावेश आहे.

जानेवारीत मतदान होणार आहे

या पुरस्कारांसाठी मतदान होणार आहे. पुढील आठवड्यात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये मतदान सुरु होईल, ज्यामध्ये जगभरातील क्रिकेटप्रेमी आणि आयसीसीच्या एलिट व्होटिंग कमिटीला मतदान करता येईल. या समितीमध्ये अनुभवी माध्यम प्रतिनिधींचा समावेश करण्यात येणार आहे.

तसेच, 2021 साली ICC ची सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू ठरलेली मानधाना पुन्हा एकदा शर्यतीत आहे. सर्व फॉरमॅटसह तिने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. तिने गेल्या वर्षी टी-20 मध्ये 594 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 696 धावा केल्या होत्या. महिला विश्वचषक आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही तिची कामगिरी वाखाणण्याजोगी होती.

त्याचबरोबर, पुरुष गटात स्टोक्स हा पुरस्काराचा प्रबळ दावेदार आहे. स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 10 पैकी 9 कसोटी जिंकल्या आहेत. त्याने 870 धावा केल्या ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने गेल्या वर्षी 26 विकेट्सही घेतल्या होत्या.

आयसीसी पुरस्कारांसाठी नामांकन यादी

  • वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू (पुरुष): बाबर आझम, सिकंदर रझा, टीम साऊदी, बेन स्टोक्स

  • वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू (महिला): अमेलिया केर, स्मृती मानधना, बेथ मुनी, नॅट सायव्हर

  • पुरुष कसोटी क्रिकेटर: जॉनी बेअरस्टो, उस्मान ख्वाजा, कागिसो रबाडा, बेन स्टोक्स

  • पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू: बाबर आझम, शेई होप, सिकंदर रझा, अॅडम झाम्पा

  • महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर: अॅलिसा हिली, शबनम इस्माईल, अमेलिया केर, नॅट सायव्हर

  • महिला T20 क्रिकेटर ऑफ द इयर: निदा दार, सोफी डिव्हाईन, स्मृती मानधना, ताहलिया मॅकग्रा

  • पुरुष टी-20 क्रिकेटपटू: सॅम करन, सिकंदर रझा, मोहम्मद रिझवान, सूर्यकुमार यादव

  • नवोदित पुरुष क्रिकेटपटू: फिन ऍलन, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, इब्राहिम झद्रान

  • आगामी महिला क्रिकेटपटू: यास्तिका भाटिया, डार्सी ब्राउन, अॅलिस कॅपेस, रेणुका सिंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT