PAK vs AFG: पाकिस्तान विरुद्ध पराभवानंतर अफगाणिस्तानी चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ, Viral Video

आशिया कप 2022 मध्ये पाकिस्तानला पराभूत झाल्यानंतर, अफगाण प्रेक्षकांनी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खूप गोंधळ घातला.
PAK vs AFG| viral video
PAK vs AFG| viral videoDainik Gomantak
Published on
Updated on

आशिया चषक स्पर्धेत बुधवारी रात्री पाकिस्तान-अफगाणिस्तान (PAK vs AFG) सामन्यानंतर बराच गदारोळ झाला. पाकिस्तानकडून झालेल्या थरारक पराभवानंतर अफगाणचे चाहते इतके संतप्त झाले की त्यांनी स्टेडियमचीच तोडफोड करण्यास सुरुवात केली. यादरम्यान अफगाण चाहत्यांनी पाकिस्तानी प्रेक्षकांवर खुर्च्याही फेकल्या. अफगाण आणि पाकिस्तानी प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाल्याच्याही बातम्या आहेत.

शारजाह क्रिकेट (Cricket) स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात एके काळी अफगाणिस्तान विजयाच्या जवळ होता. शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 11 धावा करायच्या होत्या आणि त्यांची फक्त एक विकेट शिल्लक होती. इथे नसीम शाहने दोन चेंडूत दोन षटकार मारून सामना पाकिस्तानच्या झोतात टाकला. यासह अफगाणिस्तान आशिया चषक 2022 च्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीतूनही बाहेर पडला. यानंतर स्टेडियममध्ये गोंधळ सुरू झाला.

PAK vs AFG| viral video
Asia Cup 2022 मधून टीम इंडिया जवळपास बाहेर, ट्विटरवर #SackRohit झाला ट्रेंड

19व्या षटकात पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली आणि अफगाण गोलंदाज फरीद अहमद यांच्यात भांडण झाल्यापासून स्टेडियममध्ये पाकिस्तानी आणि अफगाण प्रेक्षकांमधील वाद वाढू लागला. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर फरीदने आसिफची विकेट घेतली. यानंतर सेलिब्रेशन करताना तो आसिफपर्यंत पोहोचला. इकडे आसिफने त्याला बॅट दाखवली. यानंतर स्टेडियममध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हा सामना खूपच रोमांचक होता, या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 129 धावा केल्या होत्या. एवढ्या कमी धावसंख्येनंतरही अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानला जबरदस्त टक्कर दिली. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट घेत पाकिस्तानच्या फलंदाजांना हात उघडण्याची संधी दिली नाही. अफगाणिस्तानने शेवटच्या 5 षटकात 6 विकेट्स घेत सामना जवळपास आपल्या ताब्यात घेतला, पण शेवटच्या सामन्यात नसीम शाहच्या दोन षटकारांच्या जोरावर पाकिस्तानने सामना एका विकेटने जिंकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com