Smriti Mandhana  Dainik Gomantak
क्रीडा

Smriti Mandhana Record: स्मृती मानधनाने रचला इतिहास! महिला टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारी ठरली जगातील पहिली फलंदाज; सूजी बेट्सला पछाडले

Smriti Mandhana Highest Run Scorer Women T20: स्मृतीने महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठत जागतिक विक्रमाला गवसणी घातली. ती आता महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारी जगातील नंबर वन फलंदाज ठरली.

Manish Jadhav

Smriti Mandhana Highest Run Scorer Women T20: जपानमधील निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये रंगलेल्या एशियन गेम्स 2026च्या उपांत्य फेरीत भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने अवघ्या 19 चेंडूत 37 धावांची तुफानी खेळी साकारली, ज्यामध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या धडाकेबाज खेळीच्या जोरावर स्मृतीने महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठत जागतिक विक्रमाला गवसणी घातली. ती आता महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारी जगातील नंबर वन फलंदाज ठरली.

स्मृतीने या बाबतीत न्यूझीलंडची दिग्गज क्रिकेटपटू सूजी बेट्स हिचा विक्रम मोडीत काढला. सूजी बेट्सच्या नावावर महिला टी-20 मध्ये 4758 धावांची नोंद होती. मात्र, आता स्मृती मानधनाने 178 सामन्यांच्या 171 डावांमध्ये 30.69च्या सरासरीने एकूण 4788 धावा करत अव्वल स्थान पटकावले. गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या बॅटच्या जोरावर नवनवीन कीर्तिमान रचणाऱ्या स्मृतीच्या या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट विश्वात आनंदाचे वातावरण आहे.

या यादीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर 4301 धावांसह तिसऱ्या, श्रीलंकेची चमारी अटापट्टू 4282 धावांसह चौथ्या तर न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन 3817 धावांसह पाचव्या स्थानी आहे.

या विक्रमासोबतच स्मृती मानधना (Smriti Mandhana) आता महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (टी-20, वन-डे आणि टेस्ट मिळून) 11 हजार धावांचा टप्पा पार करण्यापासून अवघ्या तीन धावा दूर आहे. सध्या तिच्या नावावर तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून एकूण 10,987 धावा आहेत. त्यामुळे पुढील काही सामन्यांत अवघ्या 3 धावा पूर्ण करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 11,000 धावांचा टप्पा ओलांडणारी ती भारताची अत्यंत खास आणि यशस्वी फलंदाज ठरणार आहे. एशियन गेम्समधील या कामगिरीमुळे तिने पुन्हा एकदा आपली जागतिक स्तरावरील पकड सिद्ध केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravindra Jadeja ODI Career: रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द संपुष्टात? न्यूझीलंड मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या वक्तव्यानं क्रिकेट वर्तुळात खळबळ

Diwali Magazine Tradition: गोव्याच्या साहित्यविश्वाचा दिवाळी फराळ! जाणून घ्या दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT