Danushka Gunathilaka Dainik Gomantak
क्रीडा

T20 WC 2022: श्रीलंकेच्या क्रिकेटर दानुष्का गुनाथिलकाला ऑस्ट्रेलियात अटक, बलात्काराचा आरोप

Danushka Gunathilaka: श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुनाथिलका याच्यावर बलात्काराचा आरोप आहे.

दैनिक गोमन्तक

सिडनी पोलिसांनी शनिवारी श्रीलंकेचा सलामीवीर दानुष्का (Danushka Gunathilaka) गुणथिलाका याला अटक केली. त्याच्यावर बलात्काराच्या आरोपानंतर ही अटक करण्यात आली आहे. सध्या तो सिडनीत आहे, तर श्रीलंकेचा उर्वरित संघ कोलंबोला रवाना झाला आहे.

दानुष्कावर एका 29 वर्षीय महिलेने (Women) लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. दानुष्काने तिच्या राहत्या घरी लैंगिक शोषण केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. ही घटना या आठवड्याच्या सुरुवातीला घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

न्यू साउथ वेल्स पोलिसांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'एका ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे अनेक दिवसांच्या संभाषणानंतर दोघांची भेट झाली. 2 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी दानुष्काने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यानंतर पोलिसांनी आदल्या दिवशी महिलेच्या 'रोझ बे' या निवासस्थानी क्राईम सीनची तपासणी केली. तपासानंतर 31 वर्षीय दानुष्काला सिडनीतील ससेक्स स्ट्रीटवरील हॉटेलमधून अटक करण्यात आली. निवेदनात असेही म्हटले आहे की गुनाथिलकाला टीम हॉटेलमधून थेट सिडनी पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथे तिच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दनुष्का गुनाथिलका 2022 च्या T20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाचा भाग होता. येथे जरी तो एकच सामना खेळू शकला. नामिबियाविरुद्धच्या पहिल्या फेरीच्या पहिल्या सामन्यात तो उतरला होता. या सामन्यात तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तो जखमी झाला आणि संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. त्याच्या जागी अशिन बंडारा याचा संघात समावेश करण्यात आला. मात्र, बदली होऊनही गुणथिलका ऑस्ट्रेलियातच संघाशी जोडले गेले.

या डावखुऱ्या फलंदाजाने श्रीलंकेसाठी आतापर्यंत 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर अडीच हजारांहून अधिक धावांची नोंद आहे. गुनाथिलकाने नोव्हेंबर 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने 47 एकदिवसीय, 46 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 8 कसोटी सामन्यांमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याने दोन शतके झळकावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT