Boxer MC Mary Kom Retirement Dainik Gomantak
क्रीडा

Mary Kom: माझी निवृत्ती केवळ अफवा, स्वत: ऑलिम्पिक विजेतीने दिली माहिती

Mary Kom Retirement: बॉक्सिंगच्या इतिहासात सहा वर्ल्ड चॅम्पियनशीप पटकावणारी मेरी ही पहिली महिला बॉक्सर आहे. पाच वेळा आशियाई चॅम्पियन 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर होती.

Ashutosh Masgaunde

Six-time world champion olympic medal winner Mary Kom retired from boxing:

ऑलिम्पिक पदक विजेती आणि सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकलेल्या अनुभवी बॉक्सर मेरी कोमने निवृत्ती घेतल्याची माहिती समोर आली होती. मात्र, तिच्या निवृत्तीची बातमी केळव अफवाच ठरली.

कारण ऑलिम्पिक विजेत्या मेरीने, निवृत्ती घेतली नसल्याचे आणि तिच्या वाक्याचा अनर्थ केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

खरं तर, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (IBA) च्या नियमांनुसार, पुरुष आणि महिला बॉक्सरना केवळ 40 वर्षे वयापर्यंत स्पर्धांमध्ये लढण्याची परवानगी आहे. अशा स्थितीत त्यांना निवृत्तीची घोषणा करावी लागते.

एका कार्यक्रमादरम्यान, 41 वर्षीय मेरीने कबूल केले होते की, तिला अजूनही मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याची भूक आहे.

बॉक्सिंगच्या इतिहासात सहा वर्ल्ड चॅम्पियनशीप पटकावणारी मेरी ही पहिली महिला बॉक्सर आहे. पाच वेळा आशियाई चॅम्पियन 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर होती.

अनुभवी बॉक्सर मेरी कोमने 2012 च्या लंडन ऑलिम्पिक गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले होते. तिच्या नावावर असे अनेक विक्रमही आहेत.

पेनसिल्व्हेनियातील स्क्रॅंटन येथे झालेल्या जागतिक परिषदेत तिने वयाच्या १८ व्या वर्षी जगासमोर आपला खेळ दाखवला. तिने आपल्या बॉक्सिंग शैलीने सर्वांना प्रभावित केले आणि 48 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत ती कमी पडली, पण तिने भविष्यातील यशाची छाप सोडली.

पुढे, ती AIBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली. 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018 च्या मोसमात तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले होते.

मेरी कोमने बॉक्सिंगच्या इतिहासात अनेक विक्रम केले आहेत. 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी मेरी कोम ही भारतातील पहिली महिला ठरली आहे.

2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते. 2006 मध्ये, मेरी कोमला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर 2009 मध्ये, तिला देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देखील देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून 1.52 कोटींचा गंडा, सायबर फसवणूक प्रकरणी मुंबईतून एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई!

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

SCROLL FOR NEXT