Sutirtha-Ayhika wins bronze medal in Table Tennis: चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक यश मिळाले आहे. सुतीर्था मुखर्जी आणि अहिका मुखर्जी या भारतीय जोडीने टेबल टेनिसमध्ये दुहेरीत कांस्यपदक पटकावले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरीत भारतासाठी पदक जिंकणारी ती पहिली महिला जोडी ठरली आहे.
दरम्यान, सुतीर्था मुखर्जी आणि अहिका मुखर्जी या भारतीय जोडीचा सोमवारी हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला दुहेरीच्या टेबल टेनिस उपांत्य फेरीत उत्तर कोरिया (North Korea) प्रजासत्ताकच्या चा सुयोंग आणि पाक सुग्योंग यांच्यात सामना झाला. रोमहर्षक लढतीत दोघींचा पराभव झाला असला तरी तरीही त्यांनी कांस्यपदकावर कब्जा केला.
सुतीर्था आणि अहिका यांनी सकारात्मक सुरुवात करत पहिला गेम 11-7 असा जिंकला, परंतु उत्तर कोरियाच्या जोडीने जोरदार झुंज देत जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे 6 सेट पूर्ण होईपर्यंत दोन्ही संघांचे 3-3 गुण होते. मात्र, भारतीय जोडी निर्णायक सेटमध्ये 11-2 अशी पिछाडीवर पडली आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
उपांत्य फेरीच्या मार्गावर, भारतीय जोडीने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या मेंग चेन आणि यिदी वांग यांचा पराभव करुन आपल्या देशासाठी पदकावर शिक्कामोर्तब केला होता. या जोडीने 11-5, 11-5 अशी चार गेमची लढत जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. स्पर्धेची उपांत्य फेरी 5-11 आणि 11-9 ने जिंकली. चीनची (China) जोडी सध्याची जगज्जेती आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.