Shubman Gill - Virat Kohli Instagram
क्रीडा

Shubman Gill: '14 वर्षांचा असताना विराट भाईला पुरस्कार...', BCCI चा सर्वोत्तम क्रिकेटर ठरलेल्या गिलची स्पेशल पोस्ट

BCCI Awards: शुभमन गिलने बीसीसीआयचा 2022-23 हंगामाचा सर्वोत्तम क्रिकेटर पुरस्कार जिंकल्यानंतर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Pranali Kodre

Shubman Gill Social Media Post after winning best Cricketer of the Year 2022-23:

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) पुरस्कार सोहळा मंगळवारी (23 जानेवारी) हैदराबादमध्ये पार पडला. चार वर्षांच्या अंतराने हा पुरस्कार सोहळा झाला. कोविडमुळे गेली चार वर्षे या पुरस्कार सोहळ्यात खंड पडला होता. मात्र मंगळवारी गेल्या चारही वर्षातील पुरस्कार देण्यात आले.

दरम्यान, भारतीय संघाचा सध्याचा प्रिन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुभमन गिलला 2022-23 हंगामातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पॉली उम्रीगर पुरस्कार मिळाला. त्याला बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

हा पुरस्कार स्विकारल्यानंतर 24 वर्षीय गिल भावूक झाला होता. यावेळी त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना जवळपास 10 वर्षांपूर्वीची एक जुनी आठवण शेअर केली आहे.

त्याने तो 14 वर्षांचा असताना विराट कोहलीबरोबरचा बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यातील फोटो शेअर केला आहे. त्यात विराटला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळालेला दिसत आहे.

ही पोस्ट शेअर करताना गिलने लिहिले आहे की 'अनेक आठवणी ताज्या झाल्या. १४ वर्षांचा असताना इथे येऊन माझे आदर्श असलेल्यांना आणि दिग्गजांना मी पहिल्यांदा भेटत होतो. विराट भाईला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकलेला पाहिला होता, जे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. माझ्यासाठी ती पुढे जाण्यासाठी आणि माझ्या देशासाठी सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरणा होती.'

दरम्यान, आता 10 वर्षांनी गिलने सर्वोत्तम पुरस्कार आपल्या नावावर केला आहे. गिलसाठी 2022-23 हे वर्ष शानदार राहिले. त्याने या हंगामात 25 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1325 धावा केल्या आहेत. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यांत 208 धावांची खेळी केली होती.

तथापि, 2019-20 हंगामासाठी मोहम्मद शमीने, 2020-21 हंगामासाठी आर अश्विनने, तर 2021-22 हंगामासाठी जसप्रीत बुमराह यांनी पॉली उम्रीगर ट्रॉफी जिंकली. या तिघांनाही मंगळवारी हा पुरस्कार देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navratri Colours 2025: नवरात्र सुरु व्हायला काहीच दिवस बाकी! 9 दिवसांचे 9 रंग जाणून घ्या; शॉपिंगला सुरुवात करा

Horoscope: झटपट श्रीमंत होण्याची संधी! 'या' राशींसाठी मंगळाचे गोचर ठरणार 'वरदान'; मात्र काही लोकांनी राहावे सावधान

Marcel: माशेल मांस मार्केटवर जीवघेणं छप्पर! ग्राहक- विक्रेत्यांची जीवघेणी कसरत; तातडीने दुरुस्तीची मागणी

Khandola: कातळावर फुलवले नंदनवन! गोव्यातील ज्येष्ठ शेतकऱ्याने घडवला चमत्कार

Drum Circle Goa: गोव्याचा निळाशार समुद्र, लाटांची गाज; किनाऱ्यावर रंगणारी तालवाद्यांची मैफिल ‘ड्रम सर्कल’

SCROLL FOR NEXT