Shubman Gill - Dhruv Jurel | Rahul Dravid PTI
क्रीडा

Shubman Gill: 'जर तू नाही, तर मग कोण?', द्रविडचे त्या शब्दांनी गिलला मिळाली प्रेरणा; चौथ्या कसोटीनंतरची पोस्ट चर्चेत

Shubman Gill Shares Rahul Dravid's motivational Words: शुभमन गिलने त्याला प्रेरणा दिलेल्या राहुल द्रविडच्या शब्दांचा पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Shubman Gill Shares Motivational Words from Rahul Dravid

भारतीय क्रिकेट संघाने सोमवारी (26 फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला. रांचीत मिळवलेल्या या विजयासह भारताने मालिकेतही 3-1 अशी विजयी आघाडी घेतली.

या विजयात शुभमन गिलचेही मोठे योगदान राहिले. या विजयानंतर गिलने भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या प्रेरणादायी सल्ल्याचा खुलासा केला आहे.

रांची कसोटीत मिळवलेल्या विजयाबद्दल गिलने मंगळवारी (27 फेब्रुवारी) इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने द्रविडचे प्रेरणादायी शब्द लिहिले आहेत. त्याने लिहिले की 'जर तू नाही, तर कोण? आत्ता नाही, मग कधी? - राहुल द्रविड'.

त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. गिलवर द्रविडचा मोठा प्रभाव राहिला आहे. गिलने जेव्हा 2018 मध्ये 19 वर्षांखालील वर्ल्डकप पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताकडून खेळला होता, तेव्हाही द्रविडच त्या संघाचा मुख्य प्रशिक्षक होता.

तसेच त्यानंतरही द्रविडच्या मार्गदर्शनाखाली गिल युवा भारतीय संघाकडून बऱ्याचदा खेळला आहे. आता द्रविड भारताच्या वरिष्ठ संघाचाही प्रशिक्षक असल्याने गिलला त्याचे मार्गदर्शन मिळत असते.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 192 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानचा पाठलाग करताना भारताने 120 धावांवर 5 विकेट्स गमावल्या होत्या. यावेळी एक बाजू तिसऱ्या क्रमांकावर आलेला गिल सांभाळत होता. त्यानंतर त्याला यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलची साथ मिळाली.

चौथ्या दिवशी खेळपट्टी गोलंदाजांसाठी पोषक होती. त्यामुळे जेव्हा गिल आणि जुरेल यांची जोडी एकत्र आली, तेव्हाही भारताला 72 धावा करण्याचे आव्हान होते. पण गिल आणि जुरेलने संयमी खेळ करत भारताचा विजय जवळ आणला.

विशेष म्हणजे जोपर्यंत विजय आवाक्यात येत नाही, तोपर्यंत गिलने एकही मोठा फटका खेळला नव्हता. मात्र, विजय जवळ आल्यानंतर त्याने दोन षटकार खेचत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर गिल आणि जुरेल यांनी सहाव्या विकेटसाठी 72 धावांची नाबाद भागीदारी करत भारताचा विजय देखील निश्चित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT