Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 Orange Cap: शुभमन गिल ऑरेंज कॅप जिंकणारा 13 वा खेळाडू, पाहा आजपर्यंतच्या विजेत्यांची संपूर्ण लिस्ट

आयपीएलमध्ये आजपर्यंत कोणीकोणी ऑरेंज कॅप पटकावली आहे, याबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

IPL Orange Cap Winners Players: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात अंतिम सामना झाला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने विजय मिळवत विजेतेपदाला घातली. हे संघाचे पाचवे विजेतेपद ठरले आहे.

दरम्यान, या हंगामात अनेक रोमांचक सामने झाले, कधी फलंदाजांचे वर्चस्व दिसले, तर कधी गोलंदाजांनी मैदान मारलं. त्यातही सर्वाधिक धावा करण्यासाठी आणि विकेट्स घेण्यासाठी अनेक खेळाडूंमध्ये चूरस पाहाला मिळाली. प्रत्येक सामन्यागणिक ही चूरस वाढत गेली.

पण अखेर आता सर्वाधिक धावा करणारे आणि सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडूंची अंतिम यादी समोर आली आहे. आयपीएलमध्ये दरवर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप देण्यात येते.

यंदा आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलने केला आहे. त्याने 17 सामन्यांमध्ये 59.33 च्या सरासरीने 890 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 3 शतकांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाची ऑरेंज कॅप गिलने पटकावली आहे.

आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू -

  • 890 धावा - शुभमन गिल (17 सामने)

  • 730 धावा - फाफ डू प्लेसिस (14 सामने)

  • 672 धावा - डेव्हॉन कॉनवे (16 सामने)

  • 639 धावा - विराट कोहली (14 सामने)

  • 625 धावा - यशस्वी जयस्वास (14 सामने)

आयपीएलमध्ये 13 खेळाडूंनी जिंकली ऑरंज कॅप

गिल ऑरेंज कॅप जिंकणारा 13 वा खेळाडू ठरला आहे. याआधी डेव्हिड वॉर्नरने 3 वेळा आणि ख्रिल गेलने 2 वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. अन्य 11 खेळाडूंनी प्रत्येकी 1 वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे.

आत्तापर्यंत ऑरेंज कॅप जिंकणारे खेळाडू

  • 2008 -शॉन मार्श (616 धावा)

  • 2009 - मॅथ्यू हेडन (572 धावा)

  • 2010 - सचिन तेंडुलकर (618 धावा)

  • 2011 - ख्रिस गेल (608 धावा)

  • 2012 - ख्रिस गेल (733 धावा)

  • 2013 - मायकल हसी (733 धावा)

  • 2014 - रॉबिन उथप्पा (660 धावा)

  • 2015 - डेव्हिड वॉर्नर (562 धावा)

  • 2016 - विराट कोहली (973 धावा)

  • 2017 - डेव्हिड वॉर्नर (641 धावा)

  • 2018 - केन विलियम्सन (735 धावा)

  • 2019 - डेव्हिड वॉर्नर (692 धावा)

  • 2020 - केएल राहुल (670 धावा)

  • 2021 - ऋतुराज गायकवाड (635 धावा)

  • 2022 - जॉस बटलर (863 धावा)

  • 2023 - शुभमन गिल (890 धावा)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

SCROLL FOR NEXT