Shreyas Iyer | Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Shreyas Iyer: 'तो क्रमांक हिरावण्याचा...' विराटच्या जागा घेण्याबद्दल अय्यरने स्पष्टच सांगितले

Pranali Kodre

Shreyas Iyer on hitting century at number 3rd spot in India vs Australia 2nd ODI Match:

भारतीय संघाने रविवारी (२४ सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदूरला झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात ९९ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने महत्त्वाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

त्याने या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळताना शतकी खेळी केली. दरम्यान, त्याने सामनावीर पुरस्कार मिळवल्यानंतर आपली प्रतिक्रियाही दिली. श्रेयसने ९० चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह १०५ धावांची खेळी केली. तसेच शुभमन गिलबरोबर दुसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी केली. गिलनेही १०४ धावांची खेळी केली.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या मालिकेपूर्वी बराच काळ अय्यर क्रिकेटपासून पाठीच्या दुखापतीमुळे दूर होता. पण, त्याने हे शतक करत तो पूर्ण फिट असल्याचे सिद्ध केले आहे.

अय्यर सामन्यानंतर म्हणाला, 'हा चढ-उतारांचा प्रवास राहिला आहे. छान वाटत आहे. मला माझ्या संघसहकाऱ्यांनी, मित्रांनी आणि कुटुंबाने पाठिंबा दिला आहे. मी टीव्हीवर सामने पाहात होतो, पण मला मैदानात संघाबरोबर खेळायचे होते, सामन्यात सहभाग घ्यायचा होता.

'मी स्वत:वर विश्वास ठेवल्याबद्दल चांगले वाटत आहे. वेदना अधून मधून होतात, पण मला माहित आहे की माझे ध्येय काय आहे. मला आंनंद वाटतोय की मी माझ्या योजना योग्यप्रकारे अंमलात आणू शकलो. खरंतर, मी जेव्हा फलंदाजीला गेलो, तेव्हा मला गोष्टी किचकट करायच्या नव्हत्या. मला पहिले माझी नजर स्थिर करायची होती, त्यातूनच मी स्वत:ला विश्वास दिला.'

दरम्यान, अय्यरने आत्तापर्यंत जेव्हाही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, तेव्हा बऱ्याचदा चांगली खेळी केली आहे.

मात्र, या क्रमांकावर गेल्या अनेक वर्षांपासून विराट कोहली फलंदाजी करतो, तसेच त्याचीही या क्रमांकावर चांगली आकडेवारी आहे. त्यामुळे बऱ्याचदा अय्यर त्यानंतर फलंदाजीला येतो. पण विराट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात नसल्याने अय्यरने तिसऱ्या जागेवर फलंदाजी केली.

याबद्दल अय्यर म्हणाला, 'माझ्या संघाला जशी गरज असेल, तसे मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार आहे. विराट दिग्गजांपैकी एक आहे. त्याची जागा हिरावण्याची काही शक्यताच नाही, मी ज्याही क्रमांकावर फलंदाजी करेल, त्यावर मला फक्त धावा करण्याची इच्छा आहे.'

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले तर भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकाच ५ बाद ३९९ धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसामुळे ऑस्ट्रेलियासमोर डकवर्थ लुईस नियमानुसार ३३ षटकात ३१७ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. पण ऑस्ट्रेलियाचा संघ २८.२ षटकात २१७ धावांवर सर्वबाद झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT