IND vs AUS: शुभमन गिल अन् शार्दुल ठाकूर तिसरा वनडे खेळणार नाही? महत्त्वाची अपडेट आली समोर

Shubman Gill - Shardul Thakur: गिल आणि ठाकूर यांच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतील उपलब्धतेबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Shardul Thakur | Shubman Gill
Shardul Thakur | Shubman GillTwitter/BCCI
Published on
Updated on

Shubman Gill Shardul Thakur may be rested from 3rd ODI Match India vs Australia at Rajkot:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना राजकोटला बुधवारी (२७ सप्टेंबर) होणार आहे. हा वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेपूर्वी होणारा अखेरचा सामना आहे. असे असले तरी, या सामन्यासाठी भारतीय संघात बदल पाहायल मिळणार आहेत.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघव्यवस्थापन शुभमन गिल आणि शार्दुल ठाकूर या दोन खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्याची दाट शक्यता आहे.

हे दोन्ही खेळाडू भारतीय संघासह राजकोटलाही जाणार नाही, तसेच ते आता वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सराव सामन्यांवेळी गुवाहाटीमध्ये भारतीय संघात पुन्हा सामील होतील. भारताला पहिला सराव सामना ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटीत इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे.

Shardul Thakur | Shubman Gill
Suryakumar Yadav: 6,6,6,6, ऑस्ट्रेलियाची पळता भूई थोडी! सूर्याची तुफानी बॅटिंग, पाहा Video

शुभमन गिल सध्या दमदार फॉर्मने खेळत आहे. त्याने यावर्षातील पाचवे शतकही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत झळकावले होते. त्याला आता वनडे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवण्याचीही संधी असणार आहे. त्यामुळे आता भारताला त्याच्याकडून वर्ल्डकपमध्येही अशाचप्रकारच्या खेळाची अपेक्षा आहे.

दरम्यान, तो यावर्षी सातत्याने खेळत असल्याने वर्ल्डकपपूर्वी त्याला काही वेळासाठी विश्रांती देण्याचा विचार संघव्यवस्थापनाने घेतला असू शकतो.

तसेच शार्दुल ठाकूरच्या फॉरबद्दल मात्र भारताचा चिंता आहे. त्याने गोलंदाजी करताना मोठ्या प्रमाणात धावा दिल्या आहेत. पण त्याची खालच्या फळीत फलंतदाजीमध्ये योगदान देण्याची क्षमता पाहाता, त्याला सातत्याने संधी दिली जात आहे. मात्र, आता काही वेळ त्यालाही विश्रांती देण्यात येणार आहे. कारण तोही वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग आहे.

Shardul Thakur | Shubman Gill
IND vs AUS: डावखुरा वॉर्नर अचानक करू लागला उजव्या हाताने बॅटिंग, नक्की काय झालं वाचा

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव अशा खेळाडूंचे पुनरागमन होणार आहे. त्यांना पहिल्या दोन्ही सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती.

तसेच पहिल्या दोन्ही सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश असेलेले ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा असे खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रवाना होणार आहेत. त्यांचा तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात समावेश नाही.

ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्याची संधी

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. भारताने या वनडे मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियावर पूर्ण वर्चस्व ठेवण्यातची संधी भारताला आहे, तर व्हाईटवॉश टाळण्यासाठी ऑस्ट्रेलिया प्रयत्न करताना दिसणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com