Crime Dainik Gomantak
क्रीडा

धक्कादायक! RCB थांबलेल्या हॉटेलमधून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तिघांना अटक

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ थांबलेल्या एका हॉटेलमधून चंदीगढमधील पोलिसांनी तिघांना अटक केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

Pranali Kodre

Three people arrested from Hotel where RCB team was staying: भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगाम सुरु आहे. या हंगामातील सामने विविध शहरांमध्ये खेळले जात आहे. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गुरुवारी (20 एप्रिल) रात्री चंदीगढ आयटी पार्क पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ थांबलेल्या एका हॉटेलमधून तीन लोकांना अटक केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात मोहालीमध्ये गुरुवारी सामना झाला, जो बेंगलोरने 24 धावांनी जिंकला होता. या सामन्यासाठी बेंगलोरचा संघ चंदीगढमध्ये थांबला होता. यादरम्यान, गुरुवारी तिघांना अटक करण्यात आली असल्याचे रिपोर्ट्स समोर आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या तिघांची मोहित भारद्वाज (33, बापू धाम, कॉलनी-26), रोहित भारद्वाज (33, झिराकपूर) आणि नवीन (32, झझ्झार जिल्हा, हरियाणा) अशी ओळख पटली आहे. अटक झालेल्या या तिघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

दरम्यान, बेंगलोरचा संघाने सामना झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी हॉटेल सोडले. समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी माहिती दिली की एका व्यक्तीने बुधवारी रात्री एक रुम बुक केली होती. पण या तिघांनी काही हॉटल स्टाफशी चूकीचे वर्तन केल्याचे समजले, त्यामुळे सुरक्षा रक्षकांना सावधही करण्यात आले होते.

तसेच रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी सांगितले की, तिघांना गुरुवारी प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली, कारण ते बेंगलोर संघाला हानी पोहोचवू शकतात अशी भीती होती.

तसेच मोहित भारद्वाज याला यापूर्वी यावर्षाच्या सुरुवातीलाच देशी बनावटीचे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच त्याआधीही त्याच्यावर काही गुन्हेगारी आरोप झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी २०१८ मध्ये सेक्टर-२६ मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात रोहित भारद्वाज यालाही अटक झालेली होती.

याशिवाय रिपोर्ट्सनुसार चौकशीदरम्यान, या तिघांनी त्या हॉटेलमध्ये राहणाऱ्या क्रिकेटर्सबरोबर फोटो काढू शकतील, म्हणून रुम बुक केल्याचे सांगितले आहे. तसेच पोलिसांनी त्यांनी रुम बुक करताना सादर केलेल्या कागदपत्रांचीही पडताळणी केली असून ते खरे असल्याचे आढळले आहेत.

तसेच पोलिसांनी हॉटेल रूमचीही तपासणी केली आहे. पण त्यात काहीही अक्षेपार्ह सापडलेले नाही. दरम्यान, या तिघांनाही स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची नियमित जामिनावर सुटका करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

IFFI 2025: आयसीएफटी युनेस्को गांधीपदक स्पर्धेतील चित्रपट कोणते? पहा लिस्ट..

Kamini Kaushal: 1948 ते 2022! मनोजकुमारचा शहीद ते आमीरच्या लालसिंग चढ्ढापर्यंत कार्यरत असणारी अभिनेत्री 'कामिनी कौशल'

SCROLL FOR NEXT