Shoaib Malik  X/ICC
क्रीडा

Shoaib Malik: शोएब मलिक अडचणीत! 'या' T20 लीगच्या फ्रँचायझीने रद्द केला करार?

Fortune Barishal: शोएब मलिक गेल्या काही दिवसात सातत्याने चर्चेत येत असून आता असे समोर येत आहे की त्याचा एका टी20 लीगमधील फ्रँचायझीने करार रद्द केला आहे.

Pranali Kodre

Shoaib Malik BPL contract terminated by franchise Fortune Barishal after suspicious no-balls and disciplinary issues - reports:

पाकिस्तानचा 41 वर्षीय अष्टपैलू शोएब मलिक सध्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. तो विविध टी20 क्रिकेट लीगमध्ये खेळत आहे. तसेच त्याने नुकतेच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदबरोबर लग्न केले आहे. आता तो एका वादग्रस्त कारणाने चर्चेत आला आहे.

अशी बातमी सध्या समोर येत आहे की बांगलादेश प्रीमियर लीगमधील फॉर्च्युन बारिशाल फ्रँचायझीने त्याच्याबरोबरचा करार रद्द केला आहे.

फॉर्च्युन बारिशाल संघाकडून सांगण्यात आले आहे की 'शोएब मलिक उर्वरित बांगलागेश प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणार नाही.' दरम्यान, फॉर्च्युन बारिशालने यामागील कारण सांगितले नाही.

परंतु बांगलादेशी मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार त्याच्याबरोबरच करार बारिशालने रद्द करण्यामागे काही कारणे आहेत, यातील शिस्तभंग आणि खुलना टायगर्सविरुद्ध तीन नो-बॉल टाकण्याबद्दल संशय ही महत्त्वाची कारणे आहेत.

रिपोर्ट्सनुसार शोएब वैयक्तिक कारणाने दुबईला जाणार होता आणि काही दिवसात परत येणार होता. मात्र, त्याने ते दिलेल्या वेळेत परत येऊ शकणार नसल्याचे कळवले. हीच गोष्ट बारिशाल फ्रँचायझीला आवडली नसल्याचे म्हटले जात आहे.

इतकेच नाही तर 22 जानेवारी 2024 रोजी खुलाना टायगर्स विरुद्ध खेळताना शोएबने एकाच षटकात तीन नो-बॉल टाकले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एकाच टी20 सामन्यात कोणत्यात फिरकीपटूने एकाच षटकात यापूर्वी तीन नोबॉल टाकलेले नाहीत.

त्यामुळे त्याच्या या नो-बॉलबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. अनेकांनी फिक्सिंगचे आरोपही केले आहेत. या गोष्टीही लक्षात घेता बारिशाल फ्रँचायझीने त्याच्याबरोबरचा करार संपवल्याचे म्हटले जात आहे.

खुलाना टायगर्सविरुद्ध चौथ्या षटकात शोएबने गोलंदाजी केली होती. हे एकच षटक त्याने टाकले होते. मात्र या षटकात तीन नो-बॉल त्याने टाकले. तसेच या षटकात एकूण 18 धावा दिल्या.

दरम्यान, त्याच्या तिसऱ्या नो-बॉलवेळी त्याचा पाय क्रिजच्या बराच बाहेर पडल्याने फिक्सिंगच्या चर्चा झाल्या होत्या. त्या सामन्यात बारिशालला 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता. शोएबच्या या तीन बॉलमुळे संघव्यवस्थापन नाखुश होते. तो त्याच्या पुढील सामन्यात केवळ फलंदाज म्हणून खेळला होता.

तसेच असेही समोर आले की फ्रँचायझी मालक मिझानुर रेहमान यांनी शोएबच्या नो-बॉलची चौकशी व्हावी अशीही मागणी केली आहे. आता हे प्रकरण कसे वळण घेणार हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, बारिशाल संघाने शोएबचा बदली खेळाडू म्हणून अहमद शहजादची निवड केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा डोक्याला शॉट लावणारा अजब प्रकार व्हायरल, नेटकरीही चक्रावले; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे ट्राय करु नका...'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियात 'सूर्य' तळपणार, कांगारुंना करणार सळो की पळो, हिटमॅन-किंग कोहलीचा 'तो' रेकॉर्ड निशाण्यावर?

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

SCROLL FOR NEXT