England Test Team PTI
क्रीडा

IND vs ENG: अँडरसनचं पदार्पण झालं, तेव्हा इंग्लंडच्या प्लेइंग-11 मधील 'या' दोघांचा जन्मही झाला नव्हता

James Anderson: विशाखापट्टणमला भारताविरुद्ध इंग्लंडच्या प्लेइंग-11 मध्ये खेळणाऱ्या दोघांच्या वयापेक्षाही अँडरसनने अधिक काळ क्रिकेट खेळले आहे.

Pranali Kodre

Shoaib Bashir and Rehan Ahmed were born after James Anderson made his Test debut:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून (2 फेब्रुवारी) सुरू झाला आहे. विशाखापट्टणमला होत असलेल्या या सामन्यात इंग्लंडने 41 वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला देखील संधी दिली आहे. त्यातबरोबर या सामन्यात 20 वर्षीय फिरकीपटू शोएब बशीरने पदार्पण झाले आहे.

दरम्यान, यामुळे एक अनोखी घटना घडताना दिसली. इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये अशा दोन खेळाडूंनाही संधी दिली आहे, ज्यांचा जेम्स अँडरसनने जेव्हा कसोटी पदार्पण केलं होते, तेव्हा जन्मही झाला नव्हता. हे दोन खेळाडू म्हणजे शोएब बशीर आणि रेहान अहमद.

अँडरसनने 22 मे 2003 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण केले होते. तो इंग्लंडकडून कसोटी पदार्पण करणारा 613 वा खेळाडू होता. त्याच्यानंतर आत्तापर्यंत जवळपास 100 खेळाडूंनी इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले आहे.

दरम्यान, अँडरसनचे पदार्पण झाल्यानंतर बशीरचा 13 ऑक्टोबर 2003 रोजी सरेमध्ये जन्म झाला, तर 13 ऑगस्ट 2004 रोजी नॉटिंगघमला रेहान अहमदचा जन्म झाला. आता या दोन्ही खेळाडूंचे कसोटीमध्ये इंग्लंडकडून पदार्पण झाले आहे.

रेहानने 2022 मध्ये कराचीला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. तो इंग्लंडकडून कसोटी पदार्पण करणारा 710 वा खेळाडू आहे. तसेच भारताविरुद्ध विशाखापट्टणमला होत असलेल्या सामन्यातून बशीरनेही पदार्पण केले आहे. बशीर इंग्लंडकडून कसोटी पदार्पण करणारा 713 वा खेळाडू आहे.

दरम्यान, अँडरसन गेल्या 22 वर्षापासून सातत्याने सलग कसोटी क्रिकेट खेळत आहे. तो 2003 पासून प्रत्येकवर्षी किमान एकतरी कसोटी सामना खेळला आहे. त्यामुळे तो 22 वर्षे सलग कसोटी क्रिकेट खेळणारा पहिलाच वेगवान गोलंदाज आहे.

इतकेच नाही, तर त्याने सलग 22 व्या वर्षीही कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेण्याचाही कारनामा केला आहे, म्हणजेच पदार्पण केल्यापासून एकही वर्ष अँडरसनचे असे गेले नाही, ज्यात त्याला विकेट मिळाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT