Shoaib Akhtar | Sachin Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

Video: जेव्हा सचिनला कोणत्याही परिस्थितीत जखमी करायचे होते, शोएब अख्तरने केलेला मोठा खुलासा

Pranali Kodre

Shoaib Akhtar wanted to hurt Sachin Tendulkar:

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर हा दिग्गज वेगवान गोलंदाजांमध्ये गणला जातो. त्याच्या कारकिर्दीत त्याने अनेकदा त्याच्या वेगाने फलंदाजांना संघर्ष करायला लावला आहे. क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांमध्येही त्याला गणले जाते. पण कारकिर्दीत त्याने काही वेळा समोरच्या फलंदाजाला धोका पोहचवण्याचा प्रयत्नाही केला असल्याचे कबुल केले आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अख्तरने जून २०२२ मध्ये स्पोर्ट्सकिडाला दिलेल्या मुलाखतीवेळीचा आहे. यात त्याने सचिन तेंडुलकरला हेतुपूर्वक जखमी करण्यासाठी गोलंदाजी केली असल्याचे कबुल केले आहे.

त्याने २००६ साली नॅशनल स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान संघात खेळल्या गेलेल्या कसोटीमधील घटना सांगितली आहे.

तो त्याच्या खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध वागणूकीचा खुलासा करताना म्हणाला होता, 'मला आज सांगायचे आहे की मला खरंतर सचिनला त्या सामन्यात जखमी करायचे होते. मी कोणत्याही परिस्थितीत सचिनला जखमी करण्याचा निश्चय केला होता. मला इंझमाम-उल-हकने विकेट्सच्या समोर गोलंदाजी करायला सांगितल्यानंतरही माझा तोच प्रयत्न होता.

'मी मुद्दाम त्याच्या हेल्मेटवर चेंडू मारत होतो. अगदी असाही विचार केलेला की त्याचा मृत्यू व्हावा. मी रिप्ले पाहिला आणि लक्षात आले की चेंडू त्याच्या कपाळाला लागला आहे. त्यानंतर मी त्याला पुन्हा जखमी करण्याचा प्रयत्न केला.'

इतकेच नाही, तर अख्तरने यापूर्वी एमएस धोनीविरुद्धही बीमर टाकण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा केला होता. त्याने 2021 मध्ये स्पोट्स तकला दिलेल्या मुलाखतीत धोनीला फैसलाबादला 2006 सालीच झालेल्या कसोटीदरम्यान बीमर टाकण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले होते.

त्याने सांगितले होते की धोनी खूप चांगला खेळाडू असून त्याने त्याच्याविरुद्ध धावाही काढल्या होत्या. त्यामुळे त्याला अशाप्रकारे गोलंदाजी करण्याचे त्याला वाईटही वाटते.

गोलंदाजी दरम्यान बीमर जाणून-बुजून टाकण्याला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे फलंदाज जखमी होऊ शकतो. क्रिकेट दरम्यान गोलंदाजांकडून चुकून बीमर टाकला जातो. दरम्यान, अशावेळी पंचांकडून गोलंदाजांना वॉर्निंग दिली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

Anti Aircraft Missile System: कोणत्या देशांकडे आहे बेस्ट एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम; भारताचं काय स्टेटस?

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

SCROLL FOR NEXT