Shoaib Akhtar & Virat Kohli
Shoaib Akhtar & Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: ''किंग कोहलीने धावा काढण्याचा नवा फॉर्म्युला शोधावा''

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 च्या खेळपट्टीवर विराट कोहलीचा (Virat Kohli) अपयशाचा प्रवास तसाच सुरु आहे, जसा ही लीग सुरु होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या (International Cricket) खेळपट्टीवर होता. लीगमधून कोहलीची बॅट जलवा दाखवेल अशी अपेक्षा होती. जेव्हा त्याने आरसीबीचे कर्णधारपद सोडले तेव्हा दबाव कमी झाल्यानंतर विराट शानदार कामगिरी करेल असे वाटले होते. परंतु, ही कहाणी अर्ध्यावरच संपली. विराटच्या फलंदाजीचा जलवा संपला आहे, असं काहीसं वाटत चाललं आहे. अपयशाचे चक्र इथेही सुरुच आहे. आतापर्यंत विराट तीनदा गोल्डन डकचा बळी ठरला आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) च्या खेळपट्टीवर विराटने जरी अर्धशतक ठोकले असले तरी त्याचा स्पीड कमी झाला आहे. एकंदरीत विराटचा तो खेळ दिसत नाही, जो पूर्वी लोकप्रिय होता. (Shoaib Akhtar said that Virat Kohli should find a new formula to score runs)

दरम्यान, अपयशाच्या सावटानं विराटलं घेरलं असताना प्रश्न उपस्थित करणारे अनेक आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरकडूनही (Shoaib Akhtar) एक वक्तव्य आले आहे. अख्तरचं हे वक्तव्य टोमणा नसून एक सूचक सल्ला आहे, ज्याचा विराटलाही प्रयत्न करायला आवडेल.

विराट कोहलीवर शोएब अख्तरचं वक्तव्य

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला, “विराट कोहली महान खेळाडू आहे. त्याला विशेष काही सिद्ध करण्याची गरज नाही. परंकु त्याला धावा करण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील, जेणेकरुन तो खराब फॉर्ममधून बाहेर पडू शकेल. सध्या धावांसाठी झगडत आहे. विराट कोहलीसारख्या खेळाडूला अशा कठीण काळातून कसे बाहेर पडायचे हे चांगलंच माहीत आहे. आणि मला खात्री आहे की, तो लवकरच बाहेर येऊन दाखवेल.”

IPL 2022 मध्ये विराट कोहली

विराट कोहली सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ओपनिंगसाठी मैदानात उतरला, परंतु केवळ एक चेंडू खेळल्यानंतर तो बाद झाला. म्हणजेच खातेही उघडता आले नाही. या मोसमात आतापर्यंत झालेल्या 12 सामन्यांमध्ये विराट कोहलीला केवळ 216 धावा करता आल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 20 ही झाली नाही. तर स्ट्राइक रेट देखील 112 पेक्षा कमी आहे. विराट कोहलीने 12 सामन्यांच्या 12 डावात केवळ एक अर्धशतक झळकावले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT