IPL 2022: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने गुजरातविरुद्धच्या सामन्यात 28 चेंडूत 43 धावा केल्या, त्याच्या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. रोहित आपल्या इनिंगमध्ये 2 षटकार मारण्यात यशस्वी ठरला आहे. हिटमॅनला अर्धशतक झळकावता आले नसले, तरी आयपीएलमध्ये खास विक्रम करण्यात तो यशस्वी ठरला आहे. आयपीएलमध्ये फ्रँचायझीकडून खेळताना 200 षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितचा समावेश झाला आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना रोहितने (Rohit Sharma) 200 षटकार पूर्ण केले आहेत. ख्रिस गेल या यादीत सर्वात पुढे आहे. आरसीबीकडून (RCB) खेळताना गेलने आयपीएलमध्ये एकूण 263 षटकार मारले आहेत. (Playing for Mumbai Indians Rohit Sharma has completed 200 sixes in IPL 2022)
दरम्यान, एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने बंगळुरुकडून खेळताना एकूण 240 षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर विराट कोहली आरसीबीसाठी आतापर्यंत 228 षटकार मारण्यात यशस्वी ठरला आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना पोलार्डने 200 षटकारही ठोकले आहेत. यासोबतच आता या यादीत रोहित शर्माचेही नाव जोडले गेले आहे. पोलार्डने आयपीएलमध्ये 222 षटकार मारले आहेत. या सामन्यात मुंबईने शानदार विजय मिळवला. आतापर्यंतच्या मोसमातील दुसरा विजय मिळवण्यात मुंबईने यश मिळवले आहे. अंतिम षटकात डॅनियल सॅम्सच्या शानदार गोलंदाजीमुळे मुंबईने शुक्रवारी इथे इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) सामन्यात गुजरात टायटन्स (GT) ला पाच धावांनी पराभूत करुन प्लेऑफमधील स्थानासाठी आपली प्रतीक्षा वाढवली.
दुसरीकडे, गुजरात टायटन्सला शेवटच्या षटकात नऊ धावांची गरज होती, परंतु सॅम्स (18 runs in three overs) सहा चेंडूत केवळ तीन धावा देऊ शकला, ज्यात राहुल तेवतियाही धावबाद झाला. इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केल्यानंतर मुंबई इंडियन्सने टीम डेव्हिडच्या ( Unbeaten 44) साथीने सहा बाद 177 धावा केल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.