या मोसमाच्या सुरुवातीला मुंबई (Mumbai) संघ एकामागून एक सामने हरू लागला तेव्हा संघ व्यवस्थापनाने वेगवेगळ्या खेळाडूंना आजमावण्यास सुरुवात केली. अनेक खेळाडूंना संधी देण्यात आली पण मुंबईला विजयाच्या मार्गावर परतता आले नाहीये. अशा स्थितीत प्रत्येक सामन्यापूर्वी प्रश्न उपस्थित होत आहे की, पुढील सामन्यात मुंबई संघ सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) मुलला पदार्पणाची संधी देणार का? आज होणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सामन्याआधी पुन्हा तोच प्रश्न निर्माण झाला, ज्याचे उत्तर संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी माध्यमांना दिले आहे. (Will Arjun Tendulkar make his IPL debut)
इंडिया टुडेशी संवाद साधताना जयवर्धने म्हणाले की, आमच्या संघातील प्रत्येक खेळाडू हा एक पर्यायच आहे. काय होऊ शकते ते आपण पाहूयातच. आमचे प्राधान्य योग्य संघ संयोजन आहे जेणेकरुन आम्ही सामने कसे जिंकू हे सुनिश्चित करू शकतो. आम्ही मोसमातील आमचा पहिला विजय नोंदवला आणि आता आम्ही सलग सामने जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून आम्हाला गमावलेला विश्वास परत मिळवता येऊ शकतो. सर्वोत्तम खेळाडूंना प्रथम संधी देण्याचे आमचे प्राधान्य आहे. अर्जुन त्यांच्यापैकी एक असेल तर आम्ही त्यालाही ती एक संधी देऊ. हे सर्व संयोजनावर अवलंबून असते असंही ते पुढे म्हणाले.
या मोसमात मुंबईने 8 सामने गमावले, आयपीएलचा हा मोसम मुंबई इंडियन्ससाठी खूपच वाईट ठरला आहे असं म्हणायला हरकत नाही. संघाने 9 पैकी फक्त एकच सामना जिंकून आपल्या नाववर केला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (Rajasthan Royal) शेवटच्या सामन्यात मुंबईला या मोसमातील एकमेव यश मिळाले आहे. आज 6 एप्रिल रोजी मुंबईचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. गुजरात संघ 10 पैकी 8 विजयांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावरती आहे.
मुंबईसाठी देशांतर्गत स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या
अर्जुन तेंडुलकरला जानेवारी 2021 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्येही तो मुंबईच्या संघाचा एक भाग राहिला आहे. जरी त्याला अद्याप प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाहीये.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.