Team India | Harbhajan Singh Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: 'तो जगातील दुसऱ्या संघात असता, तर प्लेइंग-11मध्ये असता' भारताच्या संघनिवडीवर भज्जी बरसला

Harbhajan Singh: भारतीय संघातून एका मॅनविनर खेळाडूला वगळल्याबद्दल हरभजन सिंगने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Shoaib Akhtar and Harbhajan Singh on Yuzvenrda Chahal missing in India Squad for ICC ODI Cricket World Cup 2023:

बीसीसीआयने ५ सप्टेंबर रोजी आगामी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात १५ खेळाडूंना स्थान देण्यात आले असून रोहित शर्माकडे कर्णधारद सोपवण्यात आले आहे. संघाची घोषणा झाल्यानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी आपली मते व्यक्त केली आहेत.

दरम्यान, भारताच्या संघात लेग स्पिनर युजवेंद्र चहलसा संधी मिळालेली नाही. याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय संघात फिरकीपटू म्हणून रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना संधी मिळाली आहे. यातील जडेजा आणि अक्षर हे दोघेही अष्टपैलू खेळाडू आहेत, तर कुलदीप चायनामन गोलंदाजी करतो.

स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हरभजन आणि अख्तर बोलत होते.

हरभजन म्हणाला, 'दोन खेळाडूंची संघात कमी आहे. युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग. डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज खूप मदतगार ठरतो, कारण तो तुम्हाला सुरुवातीला विकेट्स मिळवून देतो. तुम्ही शाहिन आफ्रिदी आणि मिचेल स्टार्कला पाहिले असेल की ते कसे वेगळ्या प्रकारचा प्रभाव पाडता.'

तसेच हरभजनने चहलला मॅच विनर खेळाडूही म्हटले. तो म्हणाला, 'चहलने तो मॅच विनर असल्याचे सिद्ध केले आहे. तो जर जगातील दुसऱ्या कोणत्या संघासाठी खेळत असता, तर तो संघाच्या पहिल्या ११ जणांमध्ये असता. त्याने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याची भारतीय संघान निवड न होणे, दुर्दैवी आहे.'

'आपण दोन डावखुरे फिरकीपटू निवडले आहे, जे एकत्र खेळू शकणार नाहीत आणि जर प्रतिस्पर्धी संघात खुप डावखुरे खेळाडू असतील, तर त्यांनी एकत्र खेळण्यासाठी शक्यता नाही. मला वाटते की चहल आणि अर्शदीप यांची संघात निवड व्हायला पाहिजे होती.'

हरभजनच्या मताला अख्तरनेही सहमती दर्शवली. तो म्हणाला, 'चहलला न निवडणे हे विचार करण्यापलिकडचे आहे. भारतासाठी विचित्र गोष्ट अशी की जेव्हा २२०-२३० धावा करतात, तेव्हा त्यांनी एक फलंदाज वाढवत आहे. जर तुमचे पहिले ५ फलंदाज चांगली कामगिरी करू शकत नसतील, तर आठव्या क्रमांकाचा फलंदाज चांगली खेळी कशी करेल?'

तसेच अखेरीस हरभजन आणि अख्तर यांनी भारत - पाकिस्तान सामन्यावेळी वेगळ्या भावना असतात असेही म्हटले. त्यांनी म्हटले की या सामन्यांवेळी दबाव वेगळा असतो.

वर्ल्डकप 2023 साठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT