World Cup 2023: पंच अन् रेफ्रींची ICC ने केली घोषणा, जवागल श्रीनाथसह भारताच्या दोघांना संधी

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी आयसीसीने पंच आणि सामनाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.
Javagal Srinath | Umpire
Javagal Srinath | UmpireDainik Gomantak

ICC announced Match officials Umpires for ODI Men’s Cricket World Cup 2023:

भारतात 5 ऑक्टोबरपासून क्रिकेट वर्ल्डकप 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने पंच आणि सामनाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. आयसीसीने या स्पर्धेच्या साखळी फेरीसाठी एकूण 20 अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. बाद फेरीसाठी अधिकाऱ्यांची घोषणा नंतर केली जाईल, अशी माहितीही आयसीसीने दिली.

निवड झालेल्या 20 अधिकाऱ्यांमध्ये 16 पंच आणि 4 सामनाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच या यादीत भारताच्या दोघांची नावे आहेत. यात पंच म्हणून नितीन मेनन असणार आहेत, तर सामनाधिकारी म्हणून जवागल श्रीनाथ असणार आहे.

आयसीसीने निवडलेल्या 16 पंचांच्या यादीत 12 पंच हे आयसीसीच्या एलिट पॅनलमधील आहेत, तर चार पंच आयसीसीच्या उदयोन्मुख पंचांच्या पॅनलमधील आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंडचे जेफ क्रो, झिम्बाब्वेचे अँडी पायक्रॉफ्ट, वेस्ट इंडिजचे रिची रचर्डसन आणि भारताचे जवागल श्रीनाथ हे चार सामनाधिकारी असणार आहेत.

Javagal Srinath | Umpire
सचिन तेंडुलकरला World Cup 2023 साठी मिळाला मोठा मान, BCCI ने दिलं 'गोल्डन तिकिट'

पंचांच्या एलिट पॅनलमधील क्रिस्टोफर गॅफनी (न्यूझीलंड), कुमार धर्मसेना (श्रीलंका), मराइस इरास्मस (दक्षिण आफ्रिका), मायकेल गॉफ (इंग्लंड), नितीन मेनन (भारत), पॉल रीफेल (ऑस्ट्रेलिया), रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड), रिचर्ड केटलबरो (इंग्लंड) , रॉडनी टकर (ऑस्ट्रेलिया), जोएल विल्सन (वेस्ट इंडिज), अहसान रझा (पाकिस्तान), आणि एड्रियन होल्डस्टॉक (दक्षिण आफ्रिका) या पंचाचा समावेश आहे.

तसेच आयसीसीच्या उदयोन्मुख पंचांच्या पॅनलमधील शरफुद्दौला इब्ने शाहिद (बांगलादेश), पॉल विल्सन (ऑस्ट्रेलिया), ऍलेक्स व्हार्फ (इंग्लंड) आणि ख्रिस ब्राउन (न्यूझीलंड) या चौघांचा समावेश आहे.

दरम्यान, या पंचांमधील धर्मसेना, इरास्मस आणि टकर हे तीन असे पंच आहेत, ज्यांनी २०१९ वर्ल्डकपमध्येही काम पाहिले आहे.

Javagal Srinath | Umpire
World Cup 2023 साठी टीम इंडियात संधी न मिळालेल्या खेळाडूंसाठी कर्णधार रोहितचा खास सल्ला, म्हणाला....

अहमदाबादला 5 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणाऱ्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यात मेनन आणि धर्मसेना मैदानात पंच म्हणून असतील, तर पॉल विल्सन टीव्ही पंच म्हणून काम पाहातील. तसेच शरफुद्दौला चौथे पंच असतील. पायक्रॉफ्ट सामनाधिकारी असणार आहेत.

वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. त्यापूर्वी 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने खेळवण्यात येणार आहेत.

या स्पर्धेत भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स हे 10 संघ खेळणार आहेत. या 10 संघात मिळून 10 सराव सामने आणि मुख्य स्पर्धेतील 48 सामने असे मिळून एकूण 58 सामने 12 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com