Shikhar Dhawan Emotional Post for his Son Zoravar Instagram
क्रीडा

Shikhar Dhawan: 'मला सगळीकडून ब्लॉक केलंय, पण...', शिखरच्या मुलाला वाढदिवशी भावूक शुभेच्छा

Shikhar Dhawan Post: शिखर धवनने त्याचा 9 वर्षांच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक मोठा खुलासाही केला आहे.

Pranali Kodre

Shikhar Dhawan Emotional Post for his Son Zoravar 9th Birthday:

भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन गेल्या काही काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे सातत्याने चर्चेत येत आहे. नुकतीच त्याने केलेली एक पोस्टची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

त्याने त्याचा ९ वर्षांचा मुलगा झोरावर भावूक पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्याने एक मोठा खुलासाही केला आहे. त्याने सांगितले आहे की त्याला संपर्क करण्यापासून गेल्या तीन महिन्यापासून रोखण्यात आले आहे.

पत्नी आयेशा मुखर्जीबरोबर घटस्पोटाच्या प्रकरणामुळे त्याला त्याच्या मुलाशी संपर्क करतानाही अडचणी येत असल्याचे त्याच्या या पोस्टमधून त्याने सुचवले आहे.

धवनने त्याच्या मुलाला व्हिडिओ कॉल केलेला एक जुना फोटो शेअर केला आहे. तसेच लिहिले की 'मी तुला प्रत्यक्ष पाहिले त्याला आता वर्ष होऊन गेले आणि आता जवळपास ३ महिन्यांपासून मला सगळीकडून ब्लॉक करण्यात आले आहे. त्यामुळे मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठई तोच जुना फोटो पोस्ट करत आहे.'

'मी जरी तुझ्याशी थेट संपर्क करू शकत नसेल, तरी मी तुझ्याशी टेलीपॅथीने जोडलेला आहे. मला तुझा खुप अभिमान आहे आणि मला माहित आहे तू मस्त आहेस आणि चांगल्याप्रकारे मोठा होत आहेस.'

'तुझ्या बाबाला तुझी खूप आठवण येत आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तो नेहमीच सकारात्मक आहे आणि आम्ही ईश्वरकृपेने पुन्हा भेटण्याची प्रतिक्षा करत आहे. मस्तीखोर रहा, पण विध्वंसक होऊ नकोस. देणारा हो, नम्र, दयाळू, सहनशील आणि बलवान हो.'

शिखरने पुढे लिहिले की 'मी जरी तुला भेटत नसलो, तरी तुला रोज मेसेज लिहित आहे, तुझ्या आरोग्याबद्दल आणि रोजच्या आयुष्याबद्दल रोज विचारपूस करत आहे. मी काय करत आहे आणि माझ्या आयुष्यात नवीन काय होत आहे, हे सांगत आहे.'

शिखर आणि आयेशाचा घटस्पोट

शिखरने आयेशाबरोबर 2012 साली लग्न केले होते. 2014 मध्ये झोरावरचा जन्म झाला. पण साल 2020 नंतर त्यांच्या नात्यात कटूता आल्याचे समोर आले होते.

त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये दिल्लीतील कौटुंबिक न्यायालयाने शिखरला पत्नीने त्याच्यावर मानसिक क्रूरता केल्याच्या आधारावर पत्नी आयशा मुखर्जीपासून घटस्फोट मंजूर केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT