Shikhar Dhawan: गब्बरची कारकिर्द संपली? BCCI च्या 'या' निर्णयामुळे चर्चेला उधाण

Shikhar Dhawan: शिखर धवनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर सध्या प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Shikhar Dhawan
Shikhar DhawanDainik Gomantak
Published on
Updated on

BCCI ignore Shikhar Dhawan for Asian Games: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने चीनमध्ये होणाऱ्या आगामी एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. पुरुषांच्या भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या संघाचे कर्णधारपदही 26 वर्षीय ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वी शिखर धवनला एशियन गेम्ससाठी भारतीय संघाचे कर्णधारपद मिळेल अशी मोठी चर्चा होती. पण ऋतुराजच्या गळ्यात या स्पर्धेसाठी कर्णधारपदाची माळ पडल्याने शिखरच्या कारकिर्दीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

एशियन गेम्समध्ये पुरुष क्रिकेट स्पर्धा 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान टी20 प्रकारात खेळली जाणार आहे. याचदरम्यान 5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरु होणार आहे. तसेच भारतीय संघ 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

Shikhar Dhawan
Team India for Asian Games: ऋतुराजकडे टीम इंडियाची कॅप्टन्सी! BCCI ने एशियन गेम्ससाठी केली संघाची घोषणा

त्याचमुळे या दोन्ही स्पर्धांचा कालावधी एकाचवेळी येत असल्याने बीसीसीआयने दोन्ही स्पर्धांसाठी वेगवेगळे पुरुष संघ निवडण्याचा निर्णय घेतला होता. बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते की वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी निवड न होणाऱ्या काही खेळाडूंना एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळेल.

दरम्यान, सध्याच्या भारताच्या मुख्य वनडे संघात शिखरचा समावेश नाही. त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठीही भारतीय संघात निवडण्यात आलेले नाही. तसेच याआधीच्याही काही वनडे मालिकांसाठी शिखरला भारताच्या संघात संधी देण्यात आली नव्हती.

त्याने भारताकडून अखेरचा वनडे सामना बांगलादेशविरुद्ध चितगाव येथे डिसेंबर २०२२ मध्ये खेळला आहे. त्यामुळे त्याला आगामी वनडे वर्ल्डकपमध्ये खेळवण्याची शक्यताही अल्प आहे.

अशात त्याचा एशियन गेम्ससाठीही विचार झालेला नाही. त्यामुळे जर त्याला वनडे वर्ल्डकपमध्येही संधी मिळाली नाही, तर मात्र त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहाणार आहे.

Shikhar Dhawan
Asian Games साठी महिलांचा भारतीय संघ जाहीर! हरमनप्रीत करणार चीनमध्ये नेतृत्व

शिखरची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

शिखरने त्याच्या कारकिर्दीत 34 कसोटी सामने खेळले असून 7 शतके आणि 5 अर्धशतकांसह 40.61 च्या सरासरीने 2315 धावा केल्या आहेत. तसेच 167 वनडेत त्याने 44.11 च्या सरासरीने 6793 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 17 शतकांचा आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे.

याशिवाय शिखरने 68 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 27.92 च्या सरासरीने 1759 धावा केल्या आहेत.

एशियन गेम्ससाठी भारताचा पुरुष संघ

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक)

राखीव खेळाडू - यश ठाकूर, आर साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com